कोल्हापूर : पेपरसाठी पुरेसा वेळ न दिल्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या विरोधात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत सोमवारी आंदोलन केले.राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अधिविभागाने विद्यार्थांना वेळेत असायमेंट दिल्या नाहीत. त्या पूर्ण करण्यात विद्यार्थी अडकले असता लागोपाठ पेपर असल्याने विद्यार्थ्याचा पुरेसा अभ्यास होऊ शकला नाही.
इतर अधिविभागाच्या परीक्षेतील पेपरप्रमाणे पुरेसा वेळ दिला नसल्यामुळे राजशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर सार्वजनिक बहिष्कार टाकला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. यावेळी विद्यापीठातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.