शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Kolhapur: ब्रेक मारताच एस.टी.बसमधील पत्रा सरकला, विद्यार्थीनीचा पाय इंजिनमध्ये अडकला; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 7:33 PM

पोर्ले तर्फ ठाणे : सोनुर्लेहून पन्हाळ्याकडे निघालेल्या पाटीलवाडी एस.टी.बसमधील प्रवाशी उभे राहत असलेल्या ठिकाणचा पत्रा ब्रेक मारल्यावर सरकला. एसटी ...

पोर्ले तर्फ ठाणे : सोनुर्लेहून पन्हाळ्याकडे निघालेल्या पाटीलवाडी एस.टी.बसमधील प्रवाशी उभे राहत असलेल्या ठिकाणचा पत्रा ब्रेक मारल्यावर सरकला. एसटी बसमध्ये उभी असलेली शाळकरी मुलीचे पाय पत्रा सरकल्याने निर्माण झालेल्या पोकळीतून खाली चाकामधील इंजिनमध्ये अडकला. यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

शुभश्री लहू पाटील (वय १४ ,रा. उत्रे, ता.पन्हाळा) असे जखमी विद्यार्थीनीचे नाव आहे. ती आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूलमध्ये सातवीत शिकत आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास आसुर्ले -पोर्ले येथील दत्त दालमिया कारखान्याच्या बसस्थाांब्यावर घडली.अधिक माहिती अशी, सोनुर्लेहून पाटीलवाडी बस चालक जयसिंग भिमराव पाटील व वाहक संदीप विष्णू गायकवाड पन्हाळ्याकडे घेऊन निघाले होते. उत्रे येथे एसटी बसमध्ये बसलेली विद्यार्थीना शुभश्री दत्त दालमिया कारखान्याच्या बसस्थानकाजवळ येताच चालकाने ब्रेक मारल्यामुळे पत्रा निसटल्यामुळे रिकाम्या झालेल्या पोकळीतून शुभश्रीचे पाय चाकामधील इंजिनमध्ये अडकले. रस्त्यावर पडण्यापूर्वी बसमधील प्रवाशांनी तिला सावरल्याने अनर्थ टळला.शुभश्रीच्या पायाला दुखापत झाल्याने बसच्या चालक वाहकाने तिला पन्हाळा ग्रामीण रूग्णालयात उपाचारासाठी दाखल केले. असा प्रकार पुन्हा घडण्याअगोदर एस.टी.महामंडळाने वेळीच दखल घेऊन सुस्थितीत असलेल्या बसगाड्याचं प्रवासासाठी सोडाव्या अशी मागणी नागरीकांच्यातून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीAccidentअपघात