शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांचे हेलपाटे

By admin | Published: March 07, 2016 1:28 AM

शिवाजी विद्यापीठ : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांत संभ्रम; दिरंगाईचा फटका

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --शिवाजी विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. द्वितीय सत्र (सेकंड सेमिस्टर) आले तरी, पहिल्या सत्रातील (फर्स्ट सेमिस्टर)मधील उत्तरपत्रिकेच्या विद्यापीठाकडे मागणी केलेल्या छायांकीत प्रत (फोटो कॉपी) अद्याप मिळाल्या नाहीत. फोटो कॉपी मिळणार कधी? त्यानंतर फेरतपासणीसाठी अर्ज करणार कधी आणि त्याचा निकाल येईपर्यंत द्वितीय सत्र संपणार आहे. त्यामुळे फोटो कॉपीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांत अनुुत्तीर्ण झालेले अथवा अपेक्षित गुण न मिळालेले काही विद्यार्थी उत्तरपत्रिका फेरतपासणीची मागणी करतात. यासाठी पहिल्यांदा विद्यार्थी फोटो कॉपी मागवितात. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर सात दिवसांत फोटो कॉपी देणे विद्यापीठाला बंधनकारक आहे. फोटो कॉपीमध्ये काही गुणांची वाढ दिल्यास फेरतपासणीसाठी अर्ज केला जातो. अर्ज दाखल केल्यानंतर तीस दिवसांच्या आत संबंधित विद्यार्थ्यांना निकाल द्यावा लागतो, अशी विद्यापीठाची नियमावली आहे. मात्र, वास्तवाचा अनुभव विद्यार्थ्यांना वेगळाच आहे. असाच अनुभव अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आला. अभियांत्रिकी विभागाचा पहिल्या सत्रातील परीक्षांचा निकाल २७ जानेवारीला लागला. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने काहींनी फोटो कॉपीसाठी अर्ज केला. या प्रक्रियेला महिना उलटला तरी अद्याप त्यांच्या हातात काहीच पडलेले नाही. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यापीठाने सर्वच परीक्षा एक महिना अगोदर घेतल्या आहेत. अभियांत्रिकीची परीक्षा साधारणत: १५ मेपासून सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात संपतात; पण यावर्षी ९ ते २४ एप्रिल या कालावधीत परीक्षा संपविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षेसाठी एक महिना राहिला असताना मागील परीक्षेतील पेपरची फोटोकॉपी अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. आता जरी फोटो कॉपी मिळाली तरी, फेरतपासणीसाठी अर्ज करणार कधी, त्याचा निकाल लागणार कधी, तोपर्यंत सेकंड सेमिस्टर पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता, ‘फोटो कॉपी मिळेल’, एवढे साचेबद्ध व मोघम उत्तर सांगितले जाते. विद्यापीठाच्या या गलथान कारभाराने विद्यार्थी मात्र मेटाकुटीला आले आहेत. परीक्षा विभागाची दुटप्पी भूमिकाएखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक कारणामुळे परीक्षा अर्ज विहीत कालावधीत भरता आला नाही, तर विद्यापीठ नियमावर बोट ठेवत त्यांच्याकडून विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आकारते. मात्र, विद्यापीठाकडूनच एखाद्या प्रक्रियेला विलंब झाला तर त्यांना नियम कुणी विचारायचा? अशी विचारणा विद्यार्थ्यांमधून होत आहे. परीक्षा विभागाची दुटप्पी भूमिकाएखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक कारणामुळे परीक्षा अर्ज विहीत कालावधीत भरता आला नाही, तर विद्यापीठ नियमावर बोट ठेवत त्यांच्याकडून विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आकारते. मात्र, विद्यापीठाकडूनच एखाद्या प्रक्रियेला विलंब झाला तर त्यांना नियम कुणी विचारायचा? अशी विचारणा विद्यार्थ्यांमधून होत आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे विकेंद्रीकरण केल्याने सातारा, सांगली जिल्ह्णांतील विविध केंद्रांवर पेपर असतात. जशी विद्यार्थ्यांची मागणी होईल, त्याप्रमाणे पेपर मागविले जातात. त्यामुळे उशीर होतो, पण बहुतांशी उत्तरपत्रिका पाठविलेल्या आहेत, येत्या दोन-तीन दिवसांत विद्यार्थ्यांना मिळतील. - महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ तक्रारीसाठी विद्यार्थी पुढे येईनातअभियांत्रिकी विभागातील हा प्रकार एक उदाहरण आहे. अशा अनेक प्रकारांमुळे विद्यार्थी घायकुतीला येतात, पण कारवाईच्या भीतीने विद्यापीठ प्रशासनाविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे कोणी धाडस करत नाही.