शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने जाणार इस्रोला; राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अनोखी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:55 AM

कुणाचे वडील कामगार, तर कुणाचे रिक्षाचालक. दूरचा प्रवास त्यांच्या नशिबीच नाही. पण, स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केल्याने इस्रोला भेट देण्याची संधी मिळाली.

कोल्हापूर : कुणाचे वडील कामगार, तर कुणाचे रिक्षाचालक. दूरचा प्रवास त्यांच्या नशिबीच नाही. त्यामुळे घराच्या अंगणातून आकाशाकडे डोळे करत विमान पाहण्यातच त्यांचा आनंद. त्यात बसण्याचं स्वप्न त्यांनी कधी पाहिलंही नसेल. पण, स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केल्याने महापालिका शाळेतील १७ विद्यार्थ्यांना बंगळुरूमधील इस्रोला (भारतीय अंतराळ संशोधन केंद्र) भेट देण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरातून हे विद्यार्थी विमानाने जाणार असल्याने या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना आकाश ठेंगणे झाले आहे. शहरात महापालिकेच्या ५८ शाळा आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकत असल्याने मनपा शाळांबद्दल पालकांमध्ये विश्वासार्हता वाढली आहे. गतवर्षी ९४ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले होते. यातील १७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले होते. यातील बहुतांश विद्यार्थी हे जरगनगर, नेहरूनगर, टेंबलाईवाडी, जाधववाडी या शाळांमधील आहेत. या विद्यार्थ्यांना इस्रोची भेट घडवून आणली जाणार आहे. सामान्य घरातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानप्रवास करायला मिळत असल्याने हे विद्यार्थी आनंदून गेले आहेत. ५ फेब्रुवारीला हे विद्यार्थी कोल्हापुरातून विमानाने बंगळुरूला जातील. त्यानंतर ते इस्रो केंद्राला भेट देणार आहेत.इस्रोला जाणारे विद्यार्थीशौर्य यशवंत पाटील, अनन्या सुशांत पोवार, अर्णव शशिकांत भोसले, अर्थव सागर वाडकर, काव्या राहुल महाजन, वसुंधरा विशाल सावंत, प्रणव महेश अरभावे, प्रतीक्षा बाबाजी फाळके, सिद्धेश बाळासाहेब काळे, सोहम परशराम पाटील, ज्ञानेश्वरी गजानन साळुंखे, सिद्धी दत्तात्रय अडसुळे, सिराज सागर चव्हाण, चंदन भोलानाथ कटवे, शौर्या अभिजित मोरे, आर्या दीपक चाटे, अर्णव सुकेश पाटील.

गुणवत्ता यादीत आलेल्या महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहित करण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेनुसार इस्रोची भेट घडवून आणली जाणार आहे. प्रत्येकवर्षी हा उपक्रम राबविला जाईल. या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. - केशव जाधव, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरisroइस्रोStudentविद्यार्थी