शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

विद्यार्थ्यांचे ‘उघड्यावर अभ्यास आंदोलन’

By admin | Published: March 05, 2016 12:33 AM

‘एआयएसएफ’चा पुढाकार : विद्यापीठातील अभ्यासिका सुरू करा

कोल्हापूर : विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातील जुनी अभ्यासिका सुरू करावी, बायोमेट्रिक पद्धत बंद करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ)चे गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ‘उघड्यावर अभ्यास’ असे अनोखे आंदोलन केले. विद्यापीठाच्या आवारातच तापलेल्या रस्त्यावर विद्यार्थी तोंडाला काळ््या फिती बांधून अभ्यासास बसले आणि त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. संबंधित मागण्यांबाबत सात दिवसांच्या आत तोडगा काढण्याचे आश्वासन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांना दिले.वाचनसंस्कृतीस पाठबळ द्या, अभ्यासिका प्रशासनाची हुकुमशाही बंद करा, छत्रपती शाहूंच्या नगरीत विद्यार्थी अभ्यासिकेहून वंचित, असे फलक घेऊन आॅल इंडिया यूथ फेडरेशनच्या कार्यकर्त्यांसह सुमारे तीनशे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. फोंडे म्हणाले, गेले चार महिने आम्ही ग्रंथालयातील विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात मंत्री, आमदार, खासदार व कुलगुरूंनाही निवेदन दिले आहे. तरीही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. विद्यापीठाने नवीन अभ्यासिका सुरू केल्याचे आम्ही स्वागत करतो; पण ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेत प्रवेश मिळालेला नाही, त्यांच्यासाठी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील जुनी अभ्यासिका सुरू ठेवावी. अभ्यासिकेतील बायोमेट्रिक पद्धतीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. या प्रवेश पद्धतीमुळे फक्त ‘नॅक’चे अधिकारी खुश होतात; पण विद्यार्थ्यांची गैरसोय होते. नवीन अभ्यासिका सुरू केली आहे; पण ती आठ ते दहा तासच सुरू असते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते; यासाठी ती २४ तास सुरू ठेवावी. यावेळी विनायक अलकुंटे, शिरीष माळी, समरजित पाटील, अमोल माने, अरविंद जगदाने, सुशांत पाटील, आदी कार्यकर्त्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. (प्रतिनिधी)नवीन अभ्यासिका सुरू केल्यानंतर जुनी बंद करण्यात आली. ती जागा आणि फर्निचर धूळ खात पडून आहे. जुन्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिकची सक्ती न करता मुक्त प्रवेश दिला जावा.- रमेश पाटील (विद्यार्थी)