कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र, लेख, त्यांच्या कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन हे नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना जो आनंद होतो तो शब्दांमध्ये मांडता येत नाही. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी ही प्रत्येक महाविद्यालयांची असते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शनिवारी केले.
शिवाजी विद्यापीठात ऑनलाइन आयोजित कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि वेणूताई चव्हाण कॉलेज यांच्या अनुक्रमे ‘यशवंत’ व ‘संगम’ नियतकालिकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
कुलगुरू शिर्के म्हणाले, महाविद्यालयांनी नियतकालिकांचे प्रकाशन न करणे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध न करून देण्यासारखे आहे.
डॉ. ए. व्ही. माळी संपादित यशवंत या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर भारत देश जगाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आत्मनिर्भर झाला आहे, हे दाखविले आहे. डॉ. महेंद्र पाटील संपादित संगम नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर संपूर्ण जगाला कोविडने बांधून टाकलेले आहे आणि हे जोखड
काढून टाकण्याची चावी भारत देशाकडे आहे, हे दर्शविले आहे.
डॉ. एल. जी. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. बी. केंगार यांनी आभार मानलेे.
---
फोटो नं १३०३२०२१-कोल-नियतकालिक
ओळ : शिवाजी विद्यापीठात शनिवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ‘यशवंत’ व ‘संगम’ नियतकालिकांचे प्रकाशन करण्यात आले.
---