राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. या उपकेंद्राच्या कार्यालय आणि जागेची पाहणी करून आवश्यक सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोल्हापूरमध्ये सारथी संस्थेच्या राज्यातील या पहिल्या उपकेंद्राचे स्वप्न साकार होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे.
- सतेज पाटील, पालकमंत्री
प्रतिक्रिया
राज्य शासनाने ‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी योग्य जागा निवडली आहे. मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल आणि सक्षम भविष्यासाठी विविध योजना या उपकेंद्रातून राबविल्या जातील. मराठा समाजाच्या शिक्षण, प्रबोधनासह शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्ण क्षमतेने या केंद्राच्या माध्यमातून काम होईल.
- इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक
चौकट-
प्रशिक्षण, शिष्यवृत्तीसह वसतिगृहाची सुविधा
‘सारथी’च्या उपकेंद्राच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा असणार आहे. शिष्यवृत्तीदेखील दिली जाणार आहे. ‘सारथी’च्या विविध ८१ उद्दिष्टांनुसार केंद्रात काम चालणार असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले.
फोटो (२५०६२०२१-कोल-सारथी तयारी फोटो, ०१, ०२) : कोल्हापुरात ‘सारथी’ संस्थेच्या उपकेंद्राची उद्घाटन आज, शनिवारी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याची तयारी शुक्रवारी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेगाने सुरू होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
===Photopath===
250621\25kol_2_25062021_5.jpg~250621\25kol_3_25062021_5.jpg~250621\25kol_4_25062021_5.jpg
===Caption===
फोटो (२५०६२०२१-कोल-सारथी तयारी फोटो, ०१, ०२) : कोल्हापुरात ‘सारथी’ संस्थेच्या उपकेंद्राची उदघाटन आज, शनिवारी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्याची तयारी शुक्रवारी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेगाने सुरू होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)~फोटो (२५०६२०२१-कोल-सारथी तयारी फोटो, ०१, ०२) : कोल्हापुरात ‘सारथी’ संस्थेच्या उपकेंद्राची उदघाटन आज, शनिवारी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्याची तयारी शुक्रवारी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेगाने सुरू होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)~फोटो (२५०६२०२१-कोल-सारथी तयारी फोटो, ०१, ०२) : कोल्हापुरात ‘सारथी’ संस्थेच्या उपकेंद्राची उदघाटन आज, शनिवारी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्याची तयारी शुक्रवारी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेगाने सुरू होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)