कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील ‘तिवरे’ धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ‘३०२’ नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन ‘राष्टÑवादी युवक कॉँग्रेस’च्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलिसांना निवेदन दिले. पोलीस ठाण्याच्या दारात खेकडे घेऊन काही काळ निदर्शने केली.
‘तिवरे’ धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे शिवसेनेचे मंत्री सांगत आहेत, त्याचा निषेध करत जबाबदार अधिकाºयांसह संबंधित विभागाच्या मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून २३ जणांचा बळी गेला. या गोष्टीचे गांभीर्य नाहीच, उलट संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहेत. खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे सांगून सरकार अंग काढून घेत आहेत. खेकड्यांमुळे धरण फुटल्याचे मंत्री सांगत असतील, तर खेकड्यांवरच ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी युवकच्या पदाधिकाºयांनी केली. पदाधिकाºयांनी मागणीचे निवेदन शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना दिले. यावेळी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सूरज चव्हाण, डॉ. शैलेश मोहिते, आदिल फरास, बाळासाहेब महामूनकर, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, राकेश कामठे, आदी उपस्थित होते.