कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथकांनी आचारसंहिता भंग होत असेल, तिथे कठोर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश पुणे विभागीय आयुक्तडॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकारी, समन्वय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय खर्च निरीक्षक सोरेन जोस, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्तडॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पुणे विभागीय उपायुक्तसंजयसिंह चव्हाण, पी. बी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, आदी प्रमुख उपस्थित होते.
स्थिर सर्वेक्षण पथकाने राष्ट्रीय महामार्ग, तसेच प्रमुख महामार्गावर वाहनांची तपासणी काटेकोरपणे करावी. भरारी पथकाने आचारसंहिता भंगाबाबत येणाऱ्या तक्रारींबरोबरच स्वत:हून कार्यवाही करण्यात सक्रीय व्हावे. सीव्हीजलवर येणाºया तक्रारींची तत्काळ दखल घेऊन, त्या तक्रारींबाबत भरारी पथकाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.सर्वच पथकांनी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कठोरपणे बजावावी. यामध्ये कसल्याही प्रकारची हयगय करू नये, निवडणूक कामकाजासाठी कर्तव्यावर असणारे अधिकारी, कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमध्ये दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, मेडिकल किट, स्वयंसेवक अशा आवश्यक उपाययोजना प्राधान्याने कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. दिव्यांग मतदारांचे १०० टक्के मतदान करण्याच्या दृष्टीने निवडणूकयंत्रणेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्ह्यात निवडणूक अनुषंगाने होत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. विशेष पोलीस महानिरीक्षक वारके आणि पोलीस अधीक्षक देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. अमन मित्तल, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्षेत्रात करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.परवानगी देताना समान न्याय द्यासभा, कॉर्नर सभांसाठी परवानगी देत असताना सर्वांना समान न्याय द्या, प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्राप्त प्रस्तावांवर तत्काळ कार्यवाही करावी. निवडणूक आयोगाची सर्व आयटी अॅप्लिकेशन्स सुरू करावीत.
निवडणूक कर्तव्यावर असणाºया मनुष्यबळाच्या आरोग्यासाठी आवश्यक तजवीज ठेवावी, अशासूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.राजकीय पक्ष, उमेदवारांच्या बॅँक खात्यांवर लक्ष ठेवाकोणत्याही उमेदवारांना आॅडिओ व्हिज्युअल माध्यमातून, तसेच सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे, असे सांगून राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सामाजिक प्रसारमाध्यमांच्या बॅँक खात्यांवर लक्ष ठेवावे, असे निर्देश डॉ. म्हैसेकर यांनी दिले.