लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शुक्रवारी दिवसभर उघडीप मिळाल्याने ‘नवउर्जा उत्सवा’मध्ये दुसºया दिवशी भाविकांची तुडुंब गर्दी झाली. शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रसिध्द अभिनेता सुबोध भावे, पुष्कर श्रोती, बालकलाकार भाग्यश्री शंखपाल यांनी या उत्सवामध्ये हजेरी लावली.
गुरूवारपासून निर्माण चौकातील या उत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला होता. शुक्रवारी सकाळपासून उघडीप मिळाल्याने सकाळी ११ वाजताच भाविकांनी येथे मोठी गर्दी केली. दिवसभर सातत्याने भाविकांनी रांगेने,शिस्तबध्द पध्दतीने येथील तेरा देवींचे मनोभावे दर्शन घेतले. प्रत्येक वेळी सादर होणाºया ‘सार्थक’ क्रिएशन्सच्या कलाकारांच्या आदिशक्तीच्या बॅलेला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.सायंकाळी विनोद तावडे यांनी सपत्नीक उत्सवस्थळी भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसा केली. त्यांच्या हस्ते यावेळी कुस्तीपटू रेश्मा माने, पर्यटन अभ्यासिका अरूणा देशपांडे आणि ‘अवनि’च्या अनुराधा भोसले यांचा सत्कार करण्यात आला. या महोत्सवाचे संयोजक संस्था असलेल्या कै. भालचंद्र चिकोडे वाचनालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सर्वांंचे स्वागत केले.
यावेळी सुबोध भावे म्हणाले, नितीन देसाई कोल्हापूरमध्ये ही भव्य दिव्य कलाकृती उभारली आहे. ते पाहून मी भारावलो आहे. कोल्हापूरमध्ये येऊन मी नेहमीच अंबाबाईचा आशिर्वाद घेतो व त्यातून मलाही उर्जा मिळते. आयुष्यभर मला हा उत्सव लक्षात राहिल.यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, संघटन मंत्री बाबा देसाई, के. एस. चौगुले, तुषार देसाई, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, मिलिंद अष्टेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले उपस्थित होते.‘उबुंटू’चा खास शो होणार दक्षिण अफ्रिकेमध्येपुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबुंटू’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याची माहिती देतानाश्रोती म्हणाले, दक्षिण अफ्रिकेमध्ये वापरण्यात येणाºया या शब्दाचा अर्थ ‘आपण सारे एकत्र आहोत’असा होतो. नेल्सन मंडेला यांनी युनोमध्ये हा शब्द वापरला. यावरूनच चित्रपटाला हे नाव दिले आहे. बंद पडणारी शाळा सुरू ठेवण्यासाठीची मुलांची धडपड या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचा एक खास शो दक्षिण अफ्रि केतील डर्बन येथे या चित्रपटाचा खास शो होणार आहे. यावेळी श्रोत्री यांनी ‘हसवाफसवी’चे अशंत: सादरीकरण करून टाळ्या घेतल्या.कुठेही बॅनर नाही की चंद्रकांतदादांचा फोटो नाही‘नवउर्जा उत्सव’या भव्य कार्यक्रमासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पाठबळ दिल्याने हा भव्य कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मात्र कुठेही या ठिकाणी चंद्रकांतदादा यांचे बॅनर, फ्लेक्स लावण्यात आला नाही. या वेगळेपणाची चर्चाही महोत्सवस्थळी सुरू होती.शुक्र वारी कोल्हापूर येथील नवउर्जा उत्सवाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत अनंत खासबारदार, राहूल चिकोडे, संदीप देसाई, बाबा देसाई उपस्थित होते.