शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘एमसॅक्स’चे अनुदान रखडले

By admin | Published: July 22, 2014 10:44 PM

जिल्ह्यातील परिस्थिती : सामाजिक संस्थांना कामकाज करणे मुश्कील

उचगाव : एमसॅक्सकडून गेल्या चार महिन्यांपासून अनुदान न आल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एड्स जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय बनली आहे. जिल्ह्यात एड्स फैलावत असताना राज्यात कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्थानावर गेला आहे. अनुदान न आल्याने सामाजिक संस्थांना कामकाज चालवणे कठीण बनले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात युवा विकास संस्था, मुक्ता, मुस्लिम समाज संस्था, नेटवर्क आॅफ पिपल लिव्हिंग विथ एच.आय.व्ही., एड्स, करुणालय, शिरोळ तालुका मोटार मालक संघ, वारांगना, लोटस मेडिकल फाउंडेशन, मैत्री, आस्था, पीएसआय, महाराष्ट्र नेटवर्क, एनकेपी, सांगली मिशन सोसायटी, दिशा, कोल्हापूर जिल्हा वृत्तपत्रलेखक संघ या सामाजिक संस्थांना एमसॅक्सचे अनुदान मिळते. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांपासून अनुदान रखडले आहे.कर्मचाऱ्यांचे पगार भागविणे सामाजिक संस्थांना शक्य नसल्याने कर्मचारी उसनवारीवर उदरनिर्वाह करीत आहेत.एड्सला आळा घालण्याकरिता कोल्हापुरात विशेष प्रयत्न चालू आहेत. आजही ऐच्छिक एचआयव्ही तपासणीमध्ये एच.आय.व्ही. पॉझिटिव्हची संख्या वाढत आहे. शासनाच्या आरोग्य विभागाने व एमसॅक्सच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन अनुदान त्वरित आदा करावे, अशी मागणी सामाजिक संस्थांमधून होत आहे.