शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

उपनगरातील जलकुंभ समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:23 AM

वास्तव्यास असणाऱ्या नागरी वस्त्यांची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, भविष्यात नव्याने निर्माण होणाऱ्या नागरी वस्त्यांची निकड दूर व्हावी यासाठी दक्षिण ...

वास्तव्यास असणाऱ्या नागरी वस्त्यांची पाण्याची गरज पूर्ण व्हावी, भविष्यात नव्याने निर्माण होणाऱ्या नागरी वस्त्यांची निकड दूर व्हावी यासाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उपनगरांत विविध योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून लाखो लिटर पाण्याची साठवण क्षमता असणारे महाकाय जलकुंभ उभारण्यात आले. यातील बहुतांश जलकुंभाना गळत्या लागल्या असून, जलकुंभांचे उभे सिंमेंटचे स्तंभ टाक्या संरक्षक कठडे, पायऱ्याची मोठी पडझड झाली आहे. मोठ्या नागरी वस्त्यांमध्ये उभे जलकुंभ धोकादायक ठरत आहेत. संरक्षक भिंतीअभावी जलकुंभ परिसराचा वापर ओपन बार, प्रेमीयुगलांचे अश्लील चाळे, पत्त्यांचे डाव यासाठी होत आहे.

उपनगरात वाढत्या अस्ताव्यस्त नागरिकरणामुळे प्रशासनाने शिंगणापूर पाणी योजना, शहर वाढीव पाणीपुरवठा योजना व अन्य योजनाअंतर्गत जलकुंभ उभारले. यातील बहुतांश जलकुंभांची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली असून, स्वतंत्र निधी उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस समस्येत भर पडत आहे. २०१२ला क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात २० लाख लिटर पाणी साठवण क्षमता असणारा जलकुंभ उभारला खरा, पण आजअखेर पाणी ना टाकीत पडले ना प्रभागातील नागरिकांना मिळाले, हे दुर्दैव.

उपनगरातील या जलकुंभांत बालिंगा, बावडा, कळंबा फिल्टर हाऊस, पुईखडी जलशुद्धिकरण केंद्रातील शुद्ध पाणी सोडले जाते. पुढे वितरण शाखेमार्फत ए, बी, वॉर्डला पाण्याचा खजिना, सीडी वॉर्डला कोकणेमठ, तर ई वॉर्डला राजारामपुरी व कावळानाका शाखेतून पाणी वितरण होते; पण ज्या महाकाय जलकुंभांमधून पाण्याचे वितरण होते त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

उपनगरांतील जलकुंभांच्या सुरक्षिततेची व दर्जाची प्रशासनाकडून वारंवार तपासणी होत नसल्याने समस्येत भर पडत आहे. पाणीपुरवठा विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पाणी सोडणे, गळत्या काढणे, दूषित पाण्याच्या तक्रारीचे निवारण ही कामे होत नाहीत. त्यामुळे उपनगरात मोठ्या नागरी वस्तीत दुरवस्था झालेल्या अवस्थेत उभे महाकाय जलकुंभ नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतात.

उपनगरांतील जलकुंभांची माहिती

जलकुंभाचे नाव स्थापनावर्ष पाणी साठवण क्षमता आपटेनगर १९६२ १५ लाख लिटर

फुलेवाडी २०१२ २० लाख लिटर

पुईखडी उंच टाकी २००८ ५ लाख लिटर

साळोखेनगर २००० १५ लाख लिटर

कळंबा फिल्टर हाऊस १९८५ १८ लाख लिटर

पाण्याचा खजिना जी एस आर १८८५ १० लाख लिटर

इ एन आर २००० १८ लाख लिटर जी एस आर शालिनी १८८५ १८ लाख लिटर

पद्मावती उद्यान २००० ५ लाख लिटर

जरगनगर २०१० १५ लाख लिटर शेंडा पार्क २००० १५ लाख लिटर

राजेंद्रनगर १९८५ १८ लाख लिटर

वैभव टेकडी भारती विद्यापीठ २०१७ ५ लाख लिटर टेंबलाईवाडी १९६५ ५ लाख लिटर टेंबलाईवाडी २००२ १५ लाख लिटर

चौकट

आपटेनगर जलकुंभाची कालमर्यादा संपली

१९६२ला उभारण्यात आलेल्या आपटेनगर जलकुंभाची कालमर्यादा संपल्याचा अहवाल प्रशासनास सादर करण्यात आला आहे. हा जलकुंभ कधी कोसळेल हे सांगता येत नाही. अमृत योजनेअंतर्गत हा जलकुंभ पडून नव्याने आपटेनगर पंपिंग स्टेशनलगत उभारण्यात येणार होता. राजेंद्रनगरातील जलकुंभाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे; पण कधी याचे उत्तर प्रशासनास ठाऊक.

प्रतिक्रिया माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले

आपटेनगर जलकुंभाबाबतीत प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा यासाठी पाठपुरावा केला होता; पण आजही प्रश्न प्रलंबित आहे. उपनगरातील धोकादायक जलकुंभांबाबत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा, मनुष्यबळ वाढवावे यासाठी प्रशासनाने तत्काळ लक्ष घालणे गरजेचे आहे.