कसबा बावडा : विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटांसह बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कसबा बावडा व परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाबरोबरच जोरदार सोसाट्याचा वारा सुटल्याने गणेशोत्सवानिमित्त मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळांनी उभारलेल्या आठ ते नऊ ठिकाणच्या स्वागतकमानी जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे काही काळ मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भरपावसात भिजत या स्वागतकमानी बाजूला करत रस्ता मोकळा केला. या पावसामुळे परिसरातील काही घरांची कौले उडून गेली, तर काही ठिकाणच्या झाडांच्या फांद्या मोडल्या. हा पाऊस सुमारे दोन तासांहून अधिक वेळ कोसळला. हा पाऊस पोटरीस येत असलेल्या भातपिकास उपयुक्त ठरणारा असल्याने शेतकरीवर्ग सुखावलाआहे.गेले तीन-चार दिवस उष्म्याचा तडाखा वाढला होता. त्याचा परिणाम भातपिकासह ऊसपिकावरही झाला होता. बुधवारी दिवसभर भयंकर उकाडा जाणवत होता. पाऊस केव्हा कोसळेल याचा नेम नव्हता. सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. सुरुवातीला दहा ते पंधरा मिनिटे गारा पडल्या. त्यानंतर मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही प्रचंड प्रमाणात वाहत होता. त्यामुळे काही ठिकाणी घरांची कौले उडून पडली, तर काही ठिकाणच्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. नुकतेच सार्वजनिक मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाल्याने मंडप उतरावयाचे काम अद्याप मंडळांनी हाती घेतलेले नव्हते. आजच्या मुसळधार पावसात या मंडळांच्या स्वागतकमानी मुख्य रस्त्यावर कोसळल्या. दरम्यान, हा पाऊस आडवा तिडवा व जोरदार वाऱ्यासह कोसळल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले. अनेक घरांतही या पावसाचे पाणी आले. हा पाऊस पोटरीला आलेल्या भातपिकास अतिशय पोषक ठरणार असल्याने बळिराजा सुखावला आहे. हा पाऊस ऊस पिकालाही दिलासा देणारा ठरला आहे.उचगाव परिसरास झोडपलेउचगाव : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सुसाट सुटलेल्या वाºयासह जोरदार परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी परिसरात परतीच्या वळीव पावसाने तब्बल दोन तास झोडपून काढले. त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले पीकवाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.शिरोलीत दोन घरे पडलीशिरोली : वळवाने शिरोलीला तब्बल दोन तास झोडपले. त्यामध्ये बाळूमामा मंदिर येथील पुजारी शिवाजी रानगे यांचे राहते घर पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुमारे दोन तास तुफान वादळी वारे आणि पावसाने शिरोली, नागाव, टोप, कासारवाडी, हालोंडीला झोडपले. त्यामध्ये शिरोली बाळूमामा मंदिर येथील रानगे, पुजारी यांची घरे पडली. ही घरे रस्त्यावरच पडल्याने वाहतूक बंद झाली होती. ही घटना घडल्याबरोबर सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य सरदार मुल्ला, प्रकाश कौंदाडे, महेश चव्हाण, महेश गावडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावर पडलेले घर जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून रस्ता मोकळा केला. शिये-बावडा रस्त्यावर हनुमाननगर येथील पंचगंगा नदीवरील दोन विजेचे खांब कोलमडून पडल्याने भागातील वीजपुरवठा खंडित झाला.
उपनगरास मुसळधार पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:46 AM