कोल्हापूर : सोशल मीडियांमुळे तरुण थोडेसे दिशाहीन झाले असून, त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रवचनाबरोबरच लाल मातीची गरज आहे. लाल मातीतच आयुष्य यशस्वी करण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
माथाडी कामगार युनियन, माथाडी पतसंस्थेच्या वतीने आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी शाहू मार्केट यार्ड येथे आयोजित गुणवंत कामगार सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील होते.
यावेळी पाठीवर पोते घेऊन दोनशे मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये निखिल पोवार (पोवारवाडी), तानाजी लव्हटे (शाहूवाडी), किसन खोत व महादेव खोत (खोतवाडी), संजय कात्रट (शाहूवाडी) यांनी क्रमांक पटकाविले. विजेत्यांसह गुणवंत माथाडी कामगारांचा गौरव खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, कुस्ती मैदानात ७२ चटकदार कुस्त्या झाल्या. यामध्ये नेत्रदीपक कुस्त्या करून मल्लांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी माथाडी कामगार नेते कृष्णात पाटील, बाजार समितीचे संचालक बाबूराव खोत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, परशराम खुडे, सुभाष जाधव, आदी उपस्थित होते.महिला कुस्तीगिरांचे मेमध्ये मैदानमाथाडी कामगारांनी कोणाच्या मदतीशिवाय आयोजित केलेल्या मैदानाचे कौतुक करत खासदार महाडिक म्हणाले, महिला कुस्तीगिरांना प्रोत्साहन देण्यासाठीमे महिन्यात खासबाग मैदानात कुस्त्यांचे आयोजन करणार आहे.