राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब आणि चाटे शिक्षण समूहाच्या श्री भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफले. ‘असा मी घडलो’ या विषयातून त्यांनी आपला जीवनप्रवास उलघडला. यशप्राप्तीसाठी कष्टाशिवाय पर्याय नाही. खडतर परिस्थितीमध्येही डगमगलो नाही. अनेक कठीण प्रसंगाशी संघर्ष केला. जीवनामध्ये लक्ष्मी येते पण, त्यासाठी सरस्वतीची साधना करावी लागते. सरस्वती प्रसन्न होण्यासाठी जीवनामध्ये प्रचंड मेहनत, चिकाटीने अभ्यास आणि प्रामाणिकपणासोबत ठेवल्या पाहिजेत. कोल्हापूर ते दिल्ली या माझ्या जीवनप्रवासात अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्या ज्ञानाच्या शिदोरीच्या जोरावर मी नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेत उत्तम कामगिरी करू शकलो, असे डॉ. यशवंतराव थोरात यांनी सांगितले. या व्याख्यानाच्या प्रारंभी चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ही व्याख्यानमाला वर्षभर सुरू राहणार असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
फोटो (२५०६२०२१-कोल-यशवंतराव थोरात (व्याख्यान) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब आणि चाटे शिक्षण समूहाच्या श्री भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेतील पहिले पुष्प नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी शुक्रवारी गुंफले.