त्यांनी राजर्षी शाहू कृषिविज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुभाष बाऊचकर व सेक्रेटरी अमित कांबळे यांच्या संकल्पनेतून उसाला पर्यायी म्हणून केलेल्या पहिल्याच आंतरपीक प्रयोगातून व नियोजनातून शेतीची चांगली मशागत, शुद्ध बियाणे, सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर या तत्त्वांचा वापर करून चांगले उत्पादन मिळवून दिले. कोरोना महामारीत लॉकडाऊन काळात अमित कांबळे यांनी गावातील तरुणांना शेतीचे महत्त्व व जनावरांच्या शेणखतातून निर्माण केलेले जैविक खत शेतातील जमिनीच्या सुपिकतेवर कसे प्रभावी काम करते, याचे प्रबोधन केले.
कोट...
सर्व शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुपीकतेसाठी जनावरांचे शेणखत एकत्र करून त्यावरती पंचगव्याचा व जैविक खतांचा वापर करून एक ट्रॉली शेणापासून सुमारे १ टन सेंद्रिय खताची निर्मिती करून ते शेतीसाठी वापरणे नेहमीच चांगले आहे.
अमित कांबळे सातार्डे.
फोटो ओळ - सातार्डे (ता. पन्हाळा) येथील अनिल पाटील यांनी उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून घेतलेले बटाटा पिकाचे उत्पादन.