शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आईने किडनी दिल्यामुळे मुलगीला पुनर्जन्म !-- कोल्हापुरात यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:00 AM

भरत बुटाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पोटच्या मुलीच्या दोन्हीही किडण्या (मूत्रपिंड) निकामी झाल्याचे डॉक्टरांकडून समजताच माउलीने आपली एक किडनी तिला दिली आणि तिचा जीव वाचविला.६२ वर्षीय मालुताई राजाराम पाटील (रा. शिरोली दु।।, ता. करवीर) असे त्या माउलीचे नाव आहे.मालुताई पाटील यांची मुलगी संगीता यांचा विवाह खोची (ता. हातकणंगले) येथील संपत ...

ठळक मुद्देशिरोली दुमाला येथील ६२ वर्षीय मालुताई पाटील यांचे दातृत्वडॉक्टरांनी रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत एकतरी किडनी बसविणे आवश्यक असल्याचे सांगितलेराजीव गांधी जीवनदायी योजनेतून एक लाख ४० हजार रुपये मिळाले.

भरत बुटाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पोटच्या मुलीच्या दोन्हीही किडण्या (मूत्रपिंड) निकामी झाल्याचे डॉक्टरांकडून समजताच माउलीने आपली एक किडनी तिला दिली आणि तिचा जीव वाचविला.६२ वर्षीय मालुताई राजाराम पाटील (रा. शिरोली दु।।, ता. करवीर) असे त्या माउलीचे नाव आहे.मालुताई पाटील यांची मुलगी संगीता यांचा विवाह खोची (ता. हातकणंगले) येथील संपत पाटील यांच्याशी १९९८ मध्ये झाला आहे. आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेले पाटील कुटुंबीय अल्पशा उत्पन्नावर गुजराण करीत आहे. दरम्यान, गेल्या सात-आठ महिन्यांपासून हात-पाय सारखे सुजू लागल्यामुळे संगीता यांना अस्वस्थ वाटू लागले होते.

गावात किरकोळ उपचारानंतर त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. काही चाचण्या घेतल्यानंतर संगीता यांच्या किडण्या निकामी झाल्याचे निदान झाले. तेथे महिनाभर उपचार घेतल्यानंतर त्यांना कोल्हापुरातीलच खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णालयामध्येगेली पाच महिने त्या डायलेसिसवर होत्या. दरम्यानच्या काळात डॉक्टरांनी रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत एकतरी किडनी बसविणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावेळी आई मालुताई या क्षणाचाही विचार न करता आपली एक किडणी देण्यास तयार झाल्या.

किडणी प्रत्यारोपणासाठी दोघींनाही तातडीने कºहाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या रविवारी आॅपरेशन करून मालुताई यांची एक किडणी संगीता यांना बसविण्यात आली.डॉ. विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही आॅपरेशन्स यशस्वी झाली. आॅपरेशननंतर दोघींचीही तब्येत चांगली आहे. अगोदरच कोल्हापुरातील उपचारार्थ एक लाख रुपये खर्च झाले होते. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये दोघींच्या आॅपरेशनसाठी तब्बल अडीच लाख रुपये खर्चआला. त्यातील राजीव गांधी जीवनदायी योजनेतून एक लाख ४० हजार रुपये मिळाले. उर्वरितखर्च पाटील कुटुंबीयांना करावा लागला. दरम्यान, मालुतार्इंनी स्वत:चा जीव धोक्यात घालून दिलेल्या किडणीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.माझ्या पोटच्या गोळ्याची ही अवस्था झाल्याचं कळल्यावर धक्काच बसला. माझं काहीही होऊ दे, पण मुलगी जगली पाहिजे, हाच विचार करून मी तिला किडणी दिली. त्यामुळं मला माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.- मालुताई पाटीलसारखं आजारी पडत असल्यामुळे मी अगोदरच अस्वस्थ झाले होते. त्यातच दोन्हीही किडण्या निकामी झाल्याचे समजताच अवसानच गळून गेले; पण माझ्या आईने आधार दिलाच, शिवाय किडणीही देऊन माझा जीव वाचविला.- संगीता पाटील