कोल्हापूर : ग्रामीण विकासाचे आणि राजकारणाचेही महत्त्वाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आरक्षण प्रक्रिया तब्बल दोन तास सुरू राहिली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या पुढाकाराने अत्यंत नेमकेपणाने ही प्रक्रिया पूर्ण झाली. काही गटांबद्दल लोकांनी हरकती घेतल्या परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही दहा आॅक्टोबरनंतर रितसर हरकत घ्या, त्याची नोंद घेऊ, असे स्पष्ट केले.जिल्हा प्रशासनाने पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण सकाळच्या टप्प्यात त्या-त्या तालुक्यांच्या ठिकाणी पूर्ण करून घेतले व त्यानंतर दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात ही प्रक्रिया सुरू झाली. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. या प्रक्रियेत कागलच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, शाहूवाडीच्या प्रांताधिकारी सुचित्रा शिंदे, तहसीलदार जयश्री जाधव, तहसीलदार (करमणूक) गणेश शिंदे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे, संजय वळवी यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)बारा मतदारसंघांची बदलली नावेमतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर १२ मतदारसंघांची नावे बदलली. पणुंद्रेचे करंजफेण, आकिवाटचे दत्तवाड, गोकुळ शिरगावचे उजळाईवाडी, कोपार्डेचे शिंगणापूर, कळंबे तर्फ ठाणेचे निगवे खालसा, कसबा तारळेचे कौलव, शेणगावचे आकुर्डे, नूलचे बड्याचीवाडी, कडगावचे गिजवणे असे नामकरण झाले. चंदगडमधील अडकूर मतदारसंघ रद्द झाला. तर हलकर्णी, कुदनूर आणि अडकूर यांची नावे रद्द होऊन तुडिये आणि माणगाव हे नवे मतदारसंघ तयार झाले.पाचगाव तणावमुक्तआमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक गटाच्या राजकीय ईर्षेतूनपाचगावच्या राजकारणाला वेगळे वळण लागले होते. परंतु पंचायत समिती व जिल्हा परिषदेलाही आरक्षित झाल्यामुळे पाचगाव तणावमुक्त झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली.नगरपालिकेनंतरजिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गटातटांच्या जोडण्या कशा होणार, हे नगरपालिकेच्या निवडणुकीतच ठरणार आहे. तिथे जे गट एकत्र येतील तेच पुढे जिल्हा परिषदेलाही एकत्र असतील. उदाहरणच द्यायचे झाल्यास कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ व ‘शाहू’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांचा गट नगरपालिकेत एकत्र राहिला तर तो जिल्हा परिषदेतही एकत्र राहील असे चित्र आहे.दोन गट झाले कमी..जिल्हा परिषदेचे ६९ मतदारसंघ होते; परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या नियमांनुसार चंदगड व शिरोळ तालुक्यांतील प्रत्येकी एक असे दोन मतदारसंघ कमी झाले. जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदनही प्रक्रिया अत्यंत सोपी व सुटसुटीत करून सांगितल्याबद्दल जिल्हाधिकारी सैनी व पुरवठा अधिकारी आगवणे यांचे उपस्थित कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
अशी झाली आरक्षण प्रक्रिया
By admin | Published: October 06, 2016 12:59 AM