शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

"गोचिडासारखे जनतेचे रक्त शोषले, म्हणूनच जेलमध्ये बेसन-भाकरी खावी लागली"- मनोज जरांगे

By उद्धव गोडसे | Published: November 17, 2023 9:40 PM

मनोज जरांगे-पाटलांचे मंत्री छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर, आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे कडाडले

उद्धव गोडसे

कोल्हापूर : जालना येथील ओबीसींच्या आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलताना ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यावर मनोज जरांगे-पाटील यांनी कोल्हापुरातील सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्याकडे एकवेळ जेवणासाठी पैसे नव्हते. त्यांनी गोचिडासारखे जनतेचे रक्त शोषले, त्यामुळेच त्यांना जेलमध्ये बेसन-भाकरी खावी लागली असा हल्ला जरांगे-पाटील यांनी केला.

मंत्री भुजबळ यांनी आरक्षण बचाव एल्गार सभेतून बोलताना मराठा आरक्षण आंदोलनासाठी राज्यभर दौरे करणारे मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केले. त्यांचे उपोषण आणि दौ-यांची थट्टा उडवताना पोलिस आणि ओबीसी नेत्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल अप्रत्यक्षरित्या जरांगे-पाटील यांना जबाबदार धरले. कोल्हापुरातील सभेत बोलताना जरांगे-पाटील यांनी मंत्री भुजबळ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल आदर होता. मात्र, एवढ्या मोठ्या माणसाने आज पातळी सोडली. आम्ही आमच्या कष्टाचे खातो. घाम गाळतो. एक दिवसाच्या जेवणासाठी पैसे नव्हते, अशी तुमची परिस्थिती होती. आज तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आली कोठून? तुम्ही गोचिडासारखे आमच्या जनतेचे रक्त शोषूण करोडोची संपत्ती कमवली. म्हणूनच तुम्हाला जेलमध्ये जाऊन बेसन-भाकरी खावी लागली. गोरगरिबांचा तळतळाट तुम्हाला स्वस्थ घरात बसू देत नव्हता. त्यामुळेच तुम्ही तुरुंगात गेला. जे सत्य आहे ते बोललेच पाहिजे.'

मीही त्यांना सोडणार नाही...मंत्री भुजबळ यांच्यावर मी काही बोलत नव्हतो. काहीही गरज नसताना ते माझ्यावर बोलत आहेत. ते काहीतरी उतरून काढत असतील तर मीही त्यांना सोडणार नाही. भुजबळ यांना राज्यात जातीय तेढ निर्माण करायची आहे. सरकारने त्यांना बोलायचे बंद करावे. अन्यथा आमचाही नाईलाज होईल. बांध फोडला तर आमच्या दोन-दोन पिढ्या बोलत नाहीत. मग आमचं आरक्षण खाणा-यांना काय करू? त्यांना रोखा, अन्यथा आम्हाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल. असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे...

मंत्री भुजबळ यांना मुख्यमंत्री बनण्याचे डोहाळे लागल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी केला. त्यांना मुख्यमंत्री बनायचे आहे. तीच इच्छा त्यांच्या ओठावर आली. पण, ते खुप अवघड आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे काय होणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळkolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण