शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

वाघबीळ घाटात वर्दळीच्या रस्त्यावर बर्निंग कारचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 3:36 PM

Fire Car Kolhapur-कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळ चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने बर्निंग कारचा थरार अनुभवयास मिळाला.फुलेवाडी येथील पाले कुटूंब देवदर्शनासाठी पन्हाळ्याकडे जात असताना दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.वर्दळीच्या रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

ठळक मुद्देवाघबीळ घाटात चालत्या कारने घेतला अचानक पेट बर्निंग कारचा थरार, अग्निशामक दलाने आणली आटोक्यात आग

पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळ चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने बर्निंग कारचा थरार अनुभवयास मिळाला.फुलेवाडी येथील पाले कुटूंब देवदर्शनासाठी पन्हाळ्याकडे जात असताना दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. वर्दळीच्या रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी गर्दी झाली होती.घटनास्थळावरून मिळाललेली माहिती अशी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरून फुलेवाडी (ता.करवीर) येथून चारचाकी गाडीतून इम्रान दिलावर पागे आपल्या कुटूंबासमवेत देवदर्शनासाठी पन्हाळ्याकडे जात होते.दुपारी चारचाकी गाडी नलवडे बंगल्याजवळ आली असता अचानक चालत्या गाडीच्या इंजिनमधून धूर आल्याने गाडी थांबविले.त्यानंतर इंजिनचे झाकण उघडले असता त्यातून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या.

चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीतील पागे कुटूंबियांना सुरक्षित बाहेर काढले.क्षणात अगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गाडीने पेट घेतली. सुरूवातील रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाश्यांनी पाणी आणि मातीने आग विझविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. दरम्यान पडवळवाडीचे माजी उपसरपंच पंडीत नवलवडे यांनी १०१ ला फोन केल्याने महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

दरम्यान गोकुळ निवडणूकीसाठी संपर्क दौऱ्यावर असलेले करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी भेदकलेल्या अपघातग्रस्त कुटूंबाला धीर देत विचारपूस केली

टॅग्स :fireआगcarकारkolhapurकोल्हापूर