शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

नांदणीचा सुधीर पाटील एमपीएससीत राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:54 AM

पुणे/कोल्हापूर : महाराष्ट लोकसेवा आयोगा तर्फे सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत जळगावचा व सध्या पुण्यात राहत असलेला रोहितकुमार राजपूत पहिला, तर नांदणीचा सुधीर पाटील दुसरा आला आहे. मागासवर्गीयांमधून सोलापूर जिल्ह्यातील अजयकुमार नष्टे, तर मुलींमधून पुणे जिल्ह्यातील रोहिणी नऱ्हे प्रथम आली.उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आदी ...

पुणे/कोल्हापूर : महाराष्ट लोकसेवा आयोगातर्फे सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत जळगावचा व सध्या पुण्यात राहत असलेला रोहितकुमार राजपूत पहिला, तर नांदणीचा सुधीर पाटील दुसरा आला आहे. मागासवर्गीयांमधून सोलापूर जिल्ह्यातील अजयकुमार नष्टे, तर मुलींमधून पुणे जिल्ह्यातील रोहिणी नऱ्हे प्रथम आली.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आदी ३७७ जागांसाठी परीक्षा झाली होती. १ लाख ९८ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ८३९ विद्यार्थी पात्र ठरले. त्यातून मुलाखतीसाठी ११९४ उमेदवार निवडले गेले. रोहितकुमार ५९९ गुणमिळवून प्रथम तर कोल्हापूरचा सुधीर पाटील ५७२ गुणांसह दुसरा, सोपान टोम्पे ५७१ गुणांसह तिसरा, अजयकुमार नष्टे ५७० गुणांसह खुल्या गटातून चौथा तर मागासवर्गीयांमधून प्रथम, दत्तू शेवाळे ५६६ गुणांसह पाचवा आला आहे.

प्रमोद कुडले, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, प्रसेनजीत प्रधान, रोहिणी नºहे, पूजा पाटील, पीयूष चिंचवडे, अमृता साबळे, नूतन खाडे आदी विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.राज्यसेवा परीक्षेचा निकाल समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.ज्या उमेदवारांची निवड झाली नाही, त्यांना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास त्यांची गुणपत्रके प्रोफाइलमध्ये अपलोड झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावेत अशी सूचना आयोगाकडून करण्यात आली आहे.सुधीर पाटील दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीउपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरे आलेले सुधीर पाटील हे नांदणी (ता. शिरोळ) येथील आहेत. दुसºया प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ेशेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुधीर यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण नांदणी हायस्कूलमध्ये झाले. इस्लामपूर येथील राजारामबापू इस्टिट्युट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथून बी. टेक मॅकॅनिकल झाल्यानंतर नरके फाऊंडेशन अ‍ॅकॅडमीमधून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१५ मध्ये राज्यसेवा परीक्षेचा पहिल्या प्रयत्नात त्यांची विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली होती. मात्र, त्यावर समाधान न मानता २०१७ मध्ये उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा त्यांनी दिली. आणि त्यात यश मिळविले.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासन सेवेत जाण्याची आपली इच्छा असल्याचे सुधीर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दररोज १० ते १२ तास अभ्यास केला. स्वत:मधील क्षमता ओळखून अभ्यासात झोकून दिल्यास यश निश्चित मिळते, असेही ते म्हणाले. 

स्पर्धा परीक्षा हे प्रचंड वैविधता असणारे क्षेत्र आहे. त्यातून समाजासाठी योगदान देता येते. त्यामुळे मी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सर्वसामान्य कुटुंंबात माझा जन्म झाला. माझे आई व वडील दोघेही फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. आई -वडिलांसह माझे मोठे बंधू व वहिनी यांचा मला पाठिंबा मिळाला.- रोहितकुमार राजपूत

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूर