कोल्हापूर : संगीतकार, कवी, गायक कै. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी आपल्या गायकीतून समाजाला संदेश देतानाच निष्ठा ठेवण्याचे शिकविले. त्यांची सावरकरांवर नितांत श्रद्धा होती. बाबूजींचा मलाही सहवास लाभला, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फडके यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सुधीर फडके जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून देवल क्लबतर्फे फडके यांनीच गायलेल्या गीतांवर आधारित राज्यस्तरीय गायन स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्यांना रविवारी संध्याकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी गायक श्रीधर फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबूंच्या गीतांचे सादरीकरण केले. याला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यांना शिल्पा पुणतांबेकर, सचिन जगताप, वैभव फणसळकर, सुनील गुरव, भाग्यश्री मुळे यांनी उत्तम साथ दिली. बाबूजींच्या अवीट गोडीच्या गीतरचना ऐकण्यासाठी नाट्यगृह तुडुंब भरले होते.
या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ९२ गायकांनी यात सहभाग घेतला. यात छोटा व मोठा अशा दोन गटांतील प्रत्येकी तीन यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व १० हजार अशी रोख बक्षिसे देण्यात आली. छोट्या गटातील तिघांना उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येक पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आले. याशिवाय चार स्पर्धकांचा विशेष बक्षिसाने गौरव करण्यात आला. यावेळी श्रीकांत डिग्रजकर यांची उपस्थिती होती.-प्रथक क्रमांकाच्या विजेत्यांना अंदमान सफरया स्पर्धेत प्रथम आलेल्या छोट्या गटातून प्रथम आलेला सिद्धराज पाटील व मोठ्या गटातून प्रथम आलेल्या अमयकुमार पोतदार यांना अंदमान येथील सावरकरांचे स्मारक पाहण्यासाठी तिकीट देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.गायन स्पर्धेतील विजेतेछोटा गट (१५ ते ३० वयोगट)प्रथम : सिद्धराज पाटील (कसबा बीड, करवीर), द्वितीय मोनिका साठे (शिंपे, ता. शाहूवाडी), तृतीय : मृण्मयी जोशी (पुणे). उत्तेजनार्थ : मुश्तकीन मोमीन (कोल्हापूर), अनुष्का आपटे (बेळगाव), सिद्धी वेताळ (मुंबई).मोठा गट (३१ ते ४५) प्रथम : अमयकुमार पोतदार (कोल्हापूर), द्वितीय : श्रेया देशपांडे (नवी मुंबई), तृतीय : समीर वायंगणकर (गोवा) स्वर्गीय सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरातील देवल क्लबतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी गायक श्रीधर फडके, श्रीकांत डिग्रजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.