शित्तूर-वारूण : शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील विठलाईवाडा धनगरवाड्यावरील दारिद्र्याशी झगडत असलेल्या वरक कुटुंबाच्या तीन चिमुकल्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह शैक्षणिक साहित्य, धान्य, आरोग्यसेवा अशा स्वरूपात अनेकांकडून या कुटुंबास आधार मिळत आहे.
मणक्याच्या आजाराने ग्रस्त वडील व कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत असलेली आई असून, नसल्यासारखी असलेली ही निराधार मुले मोडकळीस आलेल्या घरात दारिद्र्याच्या वेदना सोसत असल्याची व कुटुंबालामायेच्या आधाराची, आर्थिकमदतीची गरज असल्याची माहिती समाजासमोर ‘लोकमत’ने गुरुवार(दि. २२) च्या अंकात ‘दारिद्र्याशी झगडणाºया चिमुकल्यांना हवाय आधार’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते.या वृत्तामुळे महाराष्ट्रातील कानाकोपºयांतून अनेकांनी वरक दाम्पत्य व मुलांची भेट घेतली. या चिमुकल्यांचे संगोपन, शिक्षण व वरक दाम्पत्यांच्या उपचारासाठी अनेकजण मदतीचा हात देत आहेत. ‘लोकमत’मधील वृत्तामुळेच बयाबाई वरक यांच्या कॅन्सरसारखा दुर्धर आजारावर आवश्यक असलेले उपचार व या कुटुंबातील चिमुकल्यांचे दारिद्र्यामुळे होत असलेले हाल समजल्याने आॅल इंडिया धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी सोमवारी या मुलांची भेट घेतली. या कुटुंबास आर्थिक मदत करीत यापुढेया मुलांच्या शैक्षणिक खर्चाचीसर्व जबाबदारी आपण स्वत:घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नाव जाहीर न करता मदततळंदगे येथील मोरया ग्रुपचे अध्यक्ष कुमार पवार, उपाध्यक्ष दिलीप कुंभार व ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विठल वरख यांच्या कुटुंबास धान्य व आर्थिक मदत केली. कोल्हापूर येथील राजकुमार पवार यांनीही मुलांच्यासाठी खाऊ, कपडे याचबरोबर कुटुंबास आर्थिक मदत केली. वसगडे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार यांनीही या कुटुंबास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. बयाबाई वरक यांना कोल्हापूर येथील कॅन्सर हॉस्पिटलमधून घरी येण्यासाठी अॅम्ब्युलन्सची व्यवस्था नावाचा उल्लेख न करू इच्छिणाºया एका दातृत्ववानाने केली.