लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे यासाठी केंद्र व राज्य सरकारने साखर उद्योगांना विशेष करून अग्रक्रमाने प्राधान्य द्यावे, अशी विनंती आमदार विनय कोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली. शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परिसंवाद त्यांनी सहभाग नोंदवला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शनिवारी जैविक शेतीसह सन २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २०% इथेनॉलचा वापर करणे. जैवइंधन आदी विषयावर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हा परिसंवाद झाला. आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह पदाधिकारी व कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ५ शेतकऱ्यांना सहभागी होता आले. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व संबंधित विभागाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तात्यासाहेब कोरे नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन. एच. पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत, सचिव बी. बी. दोशिंगे, शेती अधिकारी प्रमोद पाटील, ऊस विकास अधिकारी करडे यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील विजय टकले, अशोक भोसले (कोडोली), रवी पाटील (भुयेवाडी), तुकाराम खतकर (घुणकी), सागर कुलकर्णी (मांगले), मोहन मगदूम (कोरेगाव) हे शेतकरी सहभागी झाले होते. भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे शिवप्रसाद जी, पुरुषोत्तम सामला, ए. एस. कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
फोटो ओळ - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे परिसंवाद साधला. त्यामध्ये शाहूवाडी -पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे व वारणा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी सहभागी झाले होते.
०५ वारणानगर पंतप्रधान संवाद