शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रेल्वेची महसूलवाढीसाठी साखरपेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:50 AM

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखरेच्या देशांतर्गत वाहतुकीवर असणारा पाच टक्के अधिभार रेल्वेने रद्द केला आहे. ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखरेच्या देशांतर्गत वाहतुकीवर असणारा पाच टक्के अधिभार रेल्वेने रद्द केला आहे. तसेच जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांसाठी असलेली वाहतूक भाड्यातील १५ टक्के सवलत एक आॅक्टोबरनंतरही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा व्यापारी आणि साखर कारखान्यांना होणार आहे.देशांतर्गत बाजारपेठेत दर महिन्याला सुमारे २० लाख टन साखरेची विक्री होते. कारखाना कार्यस्थळापासून ही साखर देशभर पोहोचविण्यासाठी रेल्वे एक प्रमुख साधन आहे. अलीकडच्या काळात साखर वाहतुकीला ट्रक्स आणि इतर साधनेही उपलब्ध झाल्याने रेल्वेद्वारे होणारी वाहतूक आणि त्यातून मिळणारा महसूल कमी होऊ लागला आहे. पावसाळ्यातील जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत मालवाहतूक कमी असते. त्यामुळे हा काळ मालवाहतुकीचा कृशकाळ समजला जातो. मालवाहतुकीच्या भाड्याद्वारे महसूल वाढावा, यासाठी रेल्वे दरवर्षी साखरेच्या वाहतुकीवर १५ टक्के सवलत देते. ही सवलत यंदा एक आॅक्टोबरनंतर म्हणजेच साखरेच्या नव्या हंगामातही सुरू राहणार आहे. त्याचबरोबर रेल्वे मिनी रेक आणि टू पॉईंट साखरेच्या वाहतुकीसाठी आकारला जाणारा पाच टक्के अधिभारही रेल्वेने रद्द केला आहे.रेक, मिनी रेक आणि टू पॉईंटएक रेक म्हणजे रेल्वेच्या ४२ वाघिणी किंवा डबे. त्यातून २६ हजार टन साखरेची वाहतूक होते. मिनी रेक म्हणजे रेल्वेच्या २१ वाघिणी, तर टू पॉर्इंट म्हणजे रेल्वेतून नेली जाणारी साखर २०० किलोमीटरच्या आत दोन ठिकाणी उतरविणे. मिनी रेक आणि टू पॉईंट वनद्वारे साखरेची वाहतूक करताना रेल्वेला कमी भाडे मिळते. त्यामुळे या दोन दोन प्रकारच्या वाहतुकीवर पाच टक्के अधिभार आकारला जात होता.कोल्हापुरातून होणाऱ्या साखरेच्या वाहतुकीत मोठी घटकोल्हापुरातून पश्चिम बंगाल तसेच ईशान्येकडील राज्यांत साखर मोठ्या प्रमाणात जाते. यंदा महापूर आणि अन्य कारणांमुळे कोल्हापुरातून होणारी साखरेची वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली आहे. १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या काळात १ लाख ३६ हजार ५७ टन साखरेची वाहतूक झाली होती. यावर्षी ती १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या काळात फक्त २९ हजार २४४ टन इतकी झाली आहे.महाराष्टÑातील साखर महागमहाराष्ट्रातील साखर कारखान्यांची रेल्वेने होणारी वाहतूक घटण्याचे कारण म्हणजे व्यापाऱ्यांना उत्तर प्रदेशातील साखर पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत पाठविणे अंतर कमी असल्याने स्वस्त पडते. त्या तुलनेत महाराष्ट्रातील साखर अंतर जादा असल्याने महाग पडते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील साखर गुजरात, राजस्थानमधील शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी ट्रकचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे साखरेची वाहतूक रेल्वेने होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापुरातून रेल्वेद्वारे होणारी साखरेची वाहतूक कमी झाली आहे. रेल्वेने दिलेल्या सवलतीचा साखर व्यापाºयांनी लाभ घ्यावा.- एल. एन. मेश्रामसीजीएस, कोल्हापूर रेल्वे गुड्स यार्ड