शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

साखरेच्या दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ

By admin | Published: August 07, 2015 10:53 PM

घसरणीला ब्रेक : साखर उद्योगात आशादायक वातावरण; केंद्र सरकारकडून बफर स्टॉक करण्याचे संकेत

कोपार्डे : साखर हंगाम २०१४-१५ ला आॅक्टोबर २०१४ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीपासून साखर दरात सुरू झालेली घसरण आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाच्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून साखर उद्योग वाचविण्यासाठी साखरेचा बफर स्टॉक करणार, असे सुतोवाच करताच साखर दराच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत साखर दरात प्रती क्विंटल १५० ते २०० रुपये वाढ झाली असल्याने साखर उद्योगात आशादायक चित्र निर्माण झाले आहे.हंगाम २०१४-१५ च्या सुरुवातीला साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० ते ३२०० रुपये होते. हा दर ऊस दर व उत्पादन खर्च यांचा मेळ घालण्या इतपत चांगला होता. मात्र, यानंतर साखरेच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाली. साखर उद्योग नियंत्रणमुक्त केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर साखरेची आवक सुरू झाली. त्यातच ब्राझीलमधील कारखानदारांनी इथेनॉलऐवजी साखर उत्पादनाकडे लक्ष दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दरही घसरल्याने निर्यातही ठप्प झाली.यावर्षी केंद्र व राज्य शासनाने कोणताच धोरणात्मक निर्णय साखर उद्योगाबद्दल घेतला नाही. यामुळे आॅक्टोबर २०१४ मध्ये ३१०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल असणारा साखरेचा दर १८५० ते १९१० रुपये प्रतिक्विंटल झाला. याचा परिणाम राज्य बँकेनेही कारखान्यांना प्रतिक्विंटल उचल देण्यास आखडता हात घेतला. आॅक्टोबर २०१४ मध्ये २८५० असणारे साखरेचे मूल्यांकन १९५० वर आल्याने साखर कारखाने कोट्यवधी रुपयांनी शॉर्टमार्जिनमध्ये आले. त्यामुळे देशभरात २१ हजार कोटी रुपये ऊस बिलापोटी साखर कारखान्यांकडे थकीत आहेत. कोल्हापूर विभागात ३५ कारखान्यांकडे सुमारे ८५० कोटी रुपये ऊस बिलांची थकबाकी आहे.या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील खासगी साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे दर देऊन हंगाम सुरू करताच येणार नाही, अशी भूमिका साखर कारखानदारांची संघटना ‘इस्मा’च्या माध्यमातून केंद्रात मांडली. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनीही पुढाकर घेऊन साखर उद्योग वाचविण्यासाठी केंद्राकडे पंतप्रधान व अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. याचा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या साखर कारखानदारांतील तज्ज्ञांच्याबरोबर नुकतीच नवी दिल्ली येथे बैठक घेऊन साखर उद्योगाच्या अडचणी जाणून घेतल्या. (वार्ताहर)हंगाम २०१४-१५ मध्ये साखरेच्या दरातील घसरणीचा आलेख (प्रतिक्विंटल रुपयात)आॅक्टोबर २०१४३१०० ते ३२००नोव्हेंबर २०१४२८०० ते २९००डिसेंबर २०१४२८०० ते २८५०जानेवारी २०१५२७५०फेब्रुवारी २०१५२६५०मार्च २०१५२५००एप्रिल २०१५२४००मे २०१५२३००जून २०१५२२५०जुलै २०१५२१००आॅगस्ट २०१५१९०५