शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

जगभरातील साखर उत्पादन घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:56 AM

चंद्रकांत कित्तुरे। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अतिरिक्त साखरेच्या प्रश्नाने त्रस्त असलेल्या ऊस उत्पादक देशांना यंदा दिलासा मिळण्याची शक्यता ...

चंद्रकांत कित्तुरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अतिरिक्त साखरेच्या प्रश्नाने त्रस्त असलेल्या ऊस उत्पादक देशांना यंदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जगातील साखरेची मागणी आणि पुरवठा यातील तफावत आॅक्टोबर २0१८ ते सप्टेंबर २०१९ या वर्षात ७ लाख १० हजार टन इतकी राहील, असा अंदाज ब्र्राझीलमधील साव पावलोस्थित डाटाग्रो या सल्लागार संस्थेने वर्तविला आहे. या आधी ही तफावत ३६ लाख ८० हजार टन इतकी असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.भारत, पाकिस्तानसह काही देशांमध्ये १७-१८च्या हंगामात साखरेचे बंपर उत्पादन झाल्याने अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, आंतरराष्टÑीय बाजारातील दर कोसळले. पाकिस्तान व भारताने साखर निर्यातीला चालना देण्यासाठी अनुदान देत, देशातील अतिरिक्त साखरेचा साठा कमी करण्याचा प्रयत्न केला. भारतात तर यंदा ३२२ लाख टन इतके विक्रमी साखर उत्पादन झाले. मागणी २६० लाख टनांपर्यंत असल्याने या हंगामातील ६० लाख टन व पूर्वीची शिल्लक (कॅरी ओव्हर स्टॉक) ४० लाख टन अशी १०० लाख टन साखर नवा हंगाम सुरू होताना शिल्लक आहे.अशात नव्या हंगामात ३५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा ‘इस्मा’चा अंदाज होता, पण महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागांत उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे ऊस उत्पादनात घट येऊन साखर उत्पादन ३३० लाख टन इतकेच होईल, महाराष्ट्रात ते ९० ते ९५ लाख टन इतके असेल, असा सुधारित अंदाज आहे.डाटाग्रोच्या अहवालानुसार कमी पाऊस व अन्य कारणांमुळे भारत, युरोप, रशिया, थायलंड व अमेरिकेत यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. ब्राझीलनेही ऊस मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे वळविला आहे.यामुळे ब्राझीलचे इथेनॉल उत्पादन ४०० दशलक्ष लीटर्स वरून ३५ अब्ज लटर्सवर जाण्याची शक्यता आहे, तर साखरेचे उत्पादन २७.९३ दशलक्ष टनांऐवजी २७.२९ टन इतकेच होण्याची शक्यता आहे.वायदेबाजारात दर वधारलेसाखरेच्या उत्पादनात घट येण्याच्या शक्यतेने आंतरराष्टÑीय वायदेबाजारातील साखरेचे दर वधारू लागले आहेत. बुधवारी न्यूयॉर्क येथील वायदे बाजारात मार्च महिन्यात उचलावयाच्या साखरेसाठी १४.१ ते १४. २४ सेंट प्रति पौंड दर होता. गेल्या जानेवारीपासूनचा हा सर्वाधिक दर आहे. यामुळे भारतातील कारखाने साखर निर्यातीसाठी अधिकाधिक प्रयत्न करतील. परिणामी अतिरिक्त साखरेच्या प्रश्नाची तीव्रता कमी होईल, अशी अपेक्षा आहे.