शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

साखर जप्तीच्या नोटिसा : तहसीलदारांची कारवाई -आठ दिवसांत पैसे देण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:56 PM

थकीत एफआरपीपोटी साखर कारखान्यांना आयुक्तांनी बजावलेल्या साखर जप्तीची प्रक्रिया तहसीलदारांच्या पातळीवर सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आठ दिवसांत पैसे द्या, अन्यथा जप्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशा नोटिसा

कोल्हापूर : थकीत एफआरपीपोटी साखर कारखान्यांना आयुक्तांनी बजावलेल्या साखर जप्तीची प्रक्रिया तहसीलदारांच्या पातळीवर सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आठ दिवसांत पैसे द्या, अन्यथा जप्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशा नोटिसा शुक्रवारी तहसीलदारांनी संबंधित कारखान्यांना बजावल्या आहेत.

शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे देणे १४ दिवसांत बंधनकारक आहे. हंगाम सुरू होऊन तीन महिने होत आले, तरी एक रुपयाही शेतकºयांना पैसे न दिल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पहिल्या टप्प्यात ‘वारणा’, ‘संताजी घोरपडे’, ‘दत्त-शिरोळ’, ‘गुरूदत्त-टाकळीवाडी’, ‘पंचगंगा’, ‘शरद’,‘ इको केन’ व ‘जवाहर’ या जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांवर साखर जप्तीच्या नोटिसा बजावल्या. जिल्हाधिकाºयांनी पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदारांकडे पाठविल्यानंतर त्यांनी शुक्रवारी संबंधित कारखान्यांना नोटिसा काढल्या.

शेतकºयांचे पैसे देण्यासाठी तहसीलदारांनी काहींना सात, तर काहींना आठ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत जर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पैसे दिले नाही, तर संबंधितांवर पुढील कार्यवाही सुरू करण्याचा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे.१५ जानेवारीपर्यंतचे पैसे जमासाखर जप्तीच्या नोटिसा काढलेल्या आठ कारखान्यांनी एक रुपयाही शेतकºयांना दिला नव्हता.साखर आयुक्तांच्या कारवाईनंतर १५ जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाच्या एफआरपीपैकी ८० टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे.१४ कारखान्यांची सुनावणी पूर्णएफआरपी थकवलेल्या जिल्ह्यातील १४ कारखान्यांची शुक्रवारी पुण्यात साखर आयुक्तांसमोर सुनावणी झाली.यामध्ये कारखान्यांनी साखरेचे दर, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि एफआरपीची रक्कम याचा ताळमेळ बसत नसल्याने दोन टप्प्यांत एफआरपी देत आहे; पण एफआरपीची पूर्ण रक्कम देण्यास कारखाने बांधील असल्याचे सुनावणीत सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर