बुधवारी सकाळी दहादरम्यान नदी वेस परिसरात उसाच्या फडाला अचानक आग लागली. वाऱ्याचा मोठा झोत व उन्हाचा कडाका वाढला असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली की सुमारे ३० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. यावेळी काही शेतकऱ्यांनी नदी काठावरील शेती पंप सुरू करून पाणी मारण्याचा प्रयत्न केला, काही शेतकऱ्यांनी ऊस तोडून भांगा मारला, यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली. यावेळी सरपंच तानाजी पालकर, सदस्य प्रकाश पाटील, शेतकरी वैभव पाटील, नानासाहेब पाटील उपस्थित होते. तलाठी जी.एम. शिंदे, पोलीस पाटील सुरेश पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला.
फोटो पाडळी खुर्द ता. करवीर येथील नदीवेस परिसरात उसाच्या क्षेत्राला भीषण आग लागली.