याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बिद्री ते मुधाळ तिट्टा दरम्यान असलेल्या ब्राम्हणकी नावाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही शेतकऱ्यांनी धाडसाने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीच्या ज्वालांपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते.
शेतकऱ्यांनी बिद्री साखर कारखान्याशी संपर्क साधल्यावर अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत राजेंद्र पांडुरंग कुलकर्णी व शिवाजी कृष्णा वारके यांच्या सुमारे चार एकर उसाचे मोठे नुकसान झाले.
फोटो ओळी
बोरवडे (ता. कागल) येथे शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेली आग विझविताना शेतकरी.