धामोड - धामोड ( ता. राधानगरी ) येथील किरण विष्णू पाटील व बाबुराव आबा पाटील यांचा तीन एकरातील ऊस जळून खाक झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली. धुराचे प्रचंड लोट सुरू झाल्याने गावातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव घेतली. पण वेग जोरात असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.या आगीमध्येशेतकरी किरण विष्णू पाटील व बाबुराव पाटील यांचा तीन एकर ऊस जळाला. या दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ऊस जळाला आहे. तुळशी धरण परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी असल्याने घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊसजळण्याच्या हा प्रकार घडला आहे.
आम्हा दोन शेतकऱ्यांचा तीन एकरांवरील ऊस जळून खाक झाला आहे. यात आमचे लाख रुपयाचे नुकसान झाले. किमान जळालेला ऊस तरी परिसरातील कारखान्यांनी लवकरात लवकर उचल करावा ही ही विनंती- संजय पाटील,शेतकरी, धामोड.