खुद ऊस तोडण्या दिल्यामुळे आडसाली खोडवा, बुडवा उसाची उचल बिगर सभासद करू लागले आहेत. त्यामुळे साखर उताऱ्यावर परिणाम जाणवत आहे. खुद ऊस तोडण्यामुळे ऊस तोडणी मजूर आपापली उसाची क्षेत्रे रिकामी करू लागली. बागायतदार शेतकऱ्यांच्या आडसाली लागणी, भात क्षेत्रातील ऊस लागणी, आडसाली ऊस खोडवा क्षेत्र मागे राहू लागले आहे. ज्याच्याकडे माणसे, वाहने आहेत त्यांच्याच शेतकऱ्यांचे उसाचे क्षेत्र रिकामे होऊ लागले आहे. साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी पाळी पत्रकात सावळागोंधळ उडू लागला आहे. ज्यांच्याकडे माणसं, वाहने नाहीत त्या सभासदांच्या उसाची उचल होत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी उमटू लागली आहे .
साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामात पाळी पत्रकातील ऊस तोडणीची कामे रेंगाळली असून साखर कारखाना नोंदणीकृत ऊस क्षेत्रातील उसाची उचल होऊ शकत नाही . त्यामुळे ऊस गळीत हंगाम लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
खुद ऊस तोडण्या धोरण बंद करून पाळी पत्रकानुसार उसाची उचल फेब्रुवारीअखेर करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे .
चौकट १ ) =
साखर कारखान्यांच्या आगामी निवडणुकीवर होणार परिणाम !
खुद तोडणीमुळे मोठ्या शेतकऱ्यांच्या उसाची उचल होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी होऊ लागली. साखर कारखान्यांच्या आगामी निवडणुकीवर परिणाम होणार हे स्पष्ट होऊ लागले.
चौकट २ ) =
उसाची उचल करा, अन्यथा एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्या !
साखर कारखान्याच्या नोंदणीकृत ऊस क्षेत्राची उचल वेळेत करा, अन्यथा एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी बागायतदार शेतकरी करू लागले आहेत.