मुरगूड : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याने ऊसतोड बंद कराव्यात, अशी मागणी केली. दरम्यान, ऊस मालकाने मी स्वत:च्या जबाबदारीवर ऊस कारखान्याला नेत असताना विनाकारण संघटना का अरेरावी करत आहे, असा प्रश्न उपस्थित केल्याने ऊस मालक, कारखाना कर्मचारी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. मुरगूड पोलिसांच्या बंदोबस्तात वाहने मार्गस्थ झाली.सोमवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी मुरगूडमध्ये ठिय्या मांडला होता. दरम्यान, निढोरीकडून लिंगनूरमार्गे घोरपडे कारखान्याला ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला. कोणत्याही परिस्थितीत वाहतूक रोखायचीच या पवित्र्यात कार्यकर्ते होते. दरम्यान, मुरगूडमध्ये असणाºया विभागीय कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी आले. ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरबरोबर ऊस मालक होता. तो ऊस कारखान्याला नेणार या मतावर ठाम होता.दोन्ही बाजूने कार्यकर्ते ठाम राहिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. याची कल्पना सहा. पोलीस निरीक्षक भगवान शिंदे हे पोलिसांसह घटनास्थळी आले. यावेळी अजित पोवार आणि तालुकाध्यक्ष बाळासो पाटील यांनी रविवारी कोल्हापुरातील बैठकीत दराबाबत योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत घोरपडे कारखाना तोड बंद करेल, असे आश्वासन दिले होते, पण अद्यापही कारखाना सुरू असल्याचे समजल्याने आम्ही येथे आलो आहोत. यामध्ये पुढील निर्णय होईपर्यंत कारखान्याने तोडी न देण्याचा निर्णय जाहीर केला असल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, कागल तालुका अध्यक्ष बाळासो पाटील, जनार्दन पाटील, मालोजी जाधव, शिवाजी कळमकर, नामदेव भराडे, पांडुरंग चौगले, नामदेव शिपेकर, बाजीराव कांबळे, पी. टी. पाटील, पांडुरंग पाटील, साताप्पा पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.जयसिंगपूर : उदगाव टोलनाका येथे सोमवारी रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथणी शुगर्सकडे जाणारी ऊस वाहतुकीची दोन वाहने रोखली. ऊस दराबाबत कारखानदार व संघटनेमध्ये कोणताच तोडगा न निघाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना दराबाबत आक्रमक झाली असून प्रश्न मिटल्याशिवाय धुराडी पेटवू देणार नाही असा इशाराही दिला आहे. सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, शैलेश आडके, आदी कार्यकर्त्यांनी उदगाव येथील टोल नाक्याजवळ ऊस वाहतुकीची वाहने अडविली.
‘स्वाभिमानी’ने रोखली ऊस वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:47 AM