रमेश पाटील।कोल्हापूर : दिवाळी सणाला मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून बँकेतून रोख रक्कम काढली जाते. त्यामुळे या सणाच्या काळात बँकांमध्ये रोख रकमेची हमखास टंचाई भासते; परंतु आता बँकांनी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुरेशा पैशांची तजवीज करून ठेवली आहे. तसे आदेशही बँकांच्या मुख्यालयाकडून बँकांना प्राप्त झाले आहेत. पैशांअभावी एटीएम सेंटर कोरडी पडणार नाहीत, याची काळजी घेण्यासही बँकांना सांगितले आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतही पैशांच्या टंचाईमुळे बँकेच्या ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता नाही.
दिवाळीसारख्या मोठ्या खर्चाच्या सणासाठी बँक ग्राहकांकडून एटीएममधून, तसेच प्रत्यक्ष बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन आठवडे पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्या तुलनेत पैसे बँकेत भरण्याचे प्रमाण घटते. त्यामुळे दिवसेंदिवस या काळात बँकांच्या तिजोऱ्या हलक्या होण्यास सुरुवात होते. बँकांच्या तिजोºया जरी हलक्या होत गेल्या, तरी त्यांना ट्रेझरीमार्फत पैशांचा पुरवठा होत असतो. त्यामुळे बँकांना कधी पैशांचा तुटवडा जाणवत नसतो.
मात्र, गेल्या काही वर्षांत दिवाळी सणाच्या काळात लहान बँका, पतसंस्था, के्रडिट सोसायटी, तसेच साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली जात असल्यामुळे या काळात अनेक सरकारी बँकांना कॅश टंचाईला सामोरे जावे लागत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, बँकांना स्वत:जवळ पुरेशा प्रमाणात रोख रक्कम ठेवण्याचे आदेश मुख्यालयाकडून प्राप्त झाले असून, बँकांनीही तशी तजवीज सध्या करून ठेवली आहे. तसेच ट्रेझरीतही पुरेशा प्रमाणात पैसे आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या काळात कॅश टंचाई जाणवणार नसल्याचे वास्तव आहे.
दरम्यान, बँकांचे अनेक ग्राहक एटीएममधून पैसे काढतात. दिवाळीसारख्या सणाच्या काळात तर एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे एटीएममध्ये सकाळी पैसे भरले, तर दुपारपर्यंत पैसे संपल्याचे चित्र असते. एकदा पैसे संपले की, दोन दिवस तरी त्या सेंटरमध्ये पैसे भरले जात नसल्याचे चित्र आहे. आता मात्र एटीएममध्ये पैसे संपले की, ते त्वरित भरले जावेत, अशा सूचना बँकांनी एटीएममध्ये पैसे भरणाºया एजन्सींना दिल्या आहेत.बँकेतून जादा रक्कम काढण्यावर नजरसध्या विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे ज्या ग्राहकाने प्रमाणापेक्षा जास्त रक्कम आपल्या खात्यातून काढली असल्यास व अशा खातेदाराचा संशय आल्यास अशा काही संशयास्पद खातेदारांची माहिती निवडणूक यंत्रणेला कळविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने बँकांना दिले आहेत.कॅशलेश व्यवहारास प्राधान्यग्राहकांनी कॅशलेश व्यवहार करावेत म्हणून गेल्या दोन वर्षांपासून बँकांनी आणि सरकारने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम चांगल्याप्रकारे सध्या दिसून येत आहे. अनेकजण सध्या आॅनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग व्यवहार करीत आहेत.एटीएममधून दररोज सहा कोटीदिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे चारशेंहून अधिक एटीएम सेंटरमधून दररोज सहा कोटींहून अधिक रक्कम काढली जात आहे. येत्या काही दिवसांत त्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.