लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील शास्त्रीनगरमध्ये वृध्दाने राहत्या घरी वायरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. देवदास एकनाथ कांबळे (वय ५५, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. ते इलेक्ट्रिक वायरिंगचे काम करत होते. त्यांची पत्नी, मुलगा, आई, भाऊ हे त्यांच्यापासून विभक्तपणे राहत होते. त्याच नैराश्येतून त्यांनी राहत्या घरात छताच्या फॅनशेजारी हुकाला वायरने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
राजेंद्रनगरात दोघांना माराहाण
कोल्हापूर : राजेंद्रनगरात किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले. मंगेश ज्ञानबा गायकवाड (वय २५), अंबाजी श्रीरंग काळे (२९ दोघेही रा. राजेंद्रनगर) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजण्याच्यासुमारास घडली. याप्ररणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल झाली आहे. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.