दीपक शंकर पाटील (वय ४०), वैशाली दीपक पाटील (३५) व विघ्नेश दीपक पाटील (१३) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, गोठे येथील पाटील दाम्पत्य हे आपली दोन मुले व वडील असे पाचजण एकत्र राहत होते. गुरुवारी (दि. १५) रात्री मध्यरात्रीच्या सुमारास गोठेजवळील पाण्याच्या वाटेने चालत जाऊन कुंभी नदीपात्राजवळ तिघांनी एकत्र दोरीने बांधून नदीत उडी मारत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शेजारील लोकांनी सकाळी घराला बाहेरून कडी असल्याने घर उघडून पाहिले असता त्यांना मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली. त्यानंतर गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली असता त्यांना कुंभी नदीपात्राजवळ त्यांची चप्पले सापडली. गावकऱ्यांनी नदीपात्रात शोधाशोध केली असता तिघांचे एकत्र दोरीने बांधलेले मृतदेह आढळून आले. सकाळी ९ च्या सुमारास मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.
या दाम्पत्याची इ. १० वी च्या वर्गात शिकत असणारी कन्या साक्षी दीपक पाटील (वय १६) ही आपल्या आजोळी चिंचवडे (ता. करवीर) गावी गेल्याने या घटनेतून वाचली.
याबाबतची वर्दी कळे पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, सपोनि प्रमोद सुर्वे यांनी तपासाबाबत सूचना दिल्या. मात्र, नेमके आत्महत्यचे कारण काही समजू शकले नाही.
चौकट ( १)
जीवनात अयशस्वी ठरलो, आम्हाला माफ करा, कोणालाही जबाबदार धरू नये, प्रदीप (मेहुणा) घराकडे लक्ष ठेव. संजू (चुलत भाऊ), आक्का (बहीण), अमर (भाचा) आण्णाला सांभाळा, कोणीही तक्रार करू नये, स्वखुशीने आम्ही हे करत आहोत. मी वैशाली व विघ्नेश, सर्ज्यादा व दीपक माफ करा, चुकलो, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी घरी आढळून आली.
चौकट ( २)
निर्व्यसनी असणारे दीपक पाटील हे मनमिळाऊ व सर्वांत मिळून- मिसळून वागणारे होते. त्यांच्या घरी नवरा- बायकोत कधीही भांडणतंटा होत नव्हता. त्यांची पत्नी वैशाली हीसुद्धा शांत स्वभावची होती. इ. ६ वी च्या वर्गात शिकणारा विघ्नेश हा शाळेत हुशार होता.
एक एकर बागायत जमीन असणारा दीपक शेतीच करत होता. दोन-तीन दुभती जनावरे पाळली होती. त्याची पत्नी वैशाली यासुद्धा शेतीच्या कामात मदत करत होती. अशा परिस्थितीत कुटुंबातील या तिघांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोबत फोटो मेल केला आहे -
१६ दीपक शंकर पाटील
१६ वैशाली दीपक पाटील
१६ विघ्नेश दीपक पाटील