कोल्हापूर : शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेजवळ असलेल्या गोरक्षनाथ मठाचे तात्पुरते प्रमुख पिरयोगी त्रिलोकनाथजी गुरुपिर दीनानाथजी (वय ५६) यांनी मठातील त्यांच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २७) पहाटेच्या सुमारास घडली. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.जुना राजवाडा पोलिस आणि गोरक्षनाथ मठातून मिळालेल्या माहितीनुसार, पिरयोगी त्रिलोकनाथजी हे दिवंगत मठप्रमुख गुरुपिर दीनानाथजी यांचे शिष्य होते. त्यांच्या निधनानंतर मठाची तात्पुरती जबाबदारी त्रिलोकनाथजी यांच्याकडे आली होती. मूळचे बनारस येथील त्रिलोकनाथजी पाच महिन्यांपासून शिवाजी पेठेतील गोरक्षनाथ मठात होते. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास एक भक्त मठात गेला असता, त्याने महाराजांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने त्याने शेजारच्या खोलीतून डोकावून पाहिले असता, महाराजांनी गळफास घेतल्याने दिसले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती इतर भक्तांसह पोलिसांना दिली. पोलिसांनी मठात जाऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.
कोल्हापुरातील गोरक्षनाथ मठात प्रमुख महाराजांची आत्महत्या
By उद्धव गोडसे | Published: February 27, 2023 5:10 PM