शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
3
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
4
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
5
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
6
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
8
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
9
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
10
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
11
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
12
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
13
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
15
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
16
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
17
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
18
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल
19
श्रीकांत शिंदेंनी विना परवानगी महाकाल मंदिराच्या गर्भगृहात केली पूजा; काँग्रेस नेते आक्रमक
20
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!

पत्नीच्या विरहाने पतीची मुलासह आत्महत्या

By admin | Published: May 06, 2016 12:54 AM

वळिवडेतील घटना : वर्षश्राद्धादिवशीच संपविली जीवनयात्रा

गांधीनगर : पत्नीच्या मृत्यूनंतर विरहाचे दु:ख सहन न झाल्याने पतीने मुलासह गळफास घेऊन पत्नीच्या वर्षश्राद्धादिवशीच आपली जीवनयात्रा संपविल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना गुरुवारी वळिवडे (ता. करवीर) येथे घडली. मोहन भालचंद्र चरेगावकर (वय ५१) आणि त्यांचा मुलगा विनायक (२१) अशी या पिता-पुत्रांची नावे आहेत. पत्नीच्या प्रतिमेचे पूजन करून तिच्या आठवणींच्या साक्षीनेच पतीसह या दोघांनी इहलोकीचा प्रवास संपविला.याबाबत घटनास्थळ व गांधीनगर पोलिसांकडून (पान १० वर)वडिलांसाठी शिक्षण थांबविलेमोहन आणि विनायक हे दोघेही मितभाषी. इतरांमध्ये जास्त मिसळणारे नव्हते. गेले वर्षभर हे पिता-पुत्र नेहमी एकत्र असायचे. विनायक हा अभ्यासात अतिशय हुशार होता. गतवर्षी डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमधून आयटी या विषयाची डिप्लोमा परीक्षा तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेशही मिळाला; परंतु आईचा मृत्यू झाल्याने वडील एकटे पडतील या भीतीने त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण थांबविले. कुटुंबाचा कणा असलेल्या आईच्या निधनाच्या दु:खातून हे दोघेही बाहेरच आले नाहीत. त्याच नैराश्यातून अखेर या दोघांनी जीवनयात्रा संपवली. विरह सहन होईना म्हणूनचरेगावकर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘आमच्या आत्महत्येस कोणालाही दोषी धरू नये. आम्हाला विरह सहन होईना म्हणून आम्ही जीवन संपवत आहोत.’हुशार विद्यार्थीविनायक हा स्कॉलर विद्यार्थी होता. डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्याने संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्रीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, त्यात एक वर्षाचा खंड पडला. त्याने ‘विनू चरेगावकर योगा इन मराठी’ या स्वत:च्या अ‍ॅपची नोंदणी केली होती.