शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कर्जबाजारीपणामुळे पुण्यातील व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्या -कोल्हापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:12 AM

पुण्यातील व्यावसायिक विनोद रमाकांत जोशी (वय ५९, रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पत्नी मीना जोशी (५५) यांच्यासह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

ठळक मुद्देमुलगा अत्यवस्थ : विषारी औषध प्राशन

कोल्हापूर : पुण्यातील व्यावसायिक विनोद रमाकांत जोशी (वय ५९, रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पत्नी मीना जोशी (५५) यांच्यासह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.या घटनेत मुलगा श्रेयस (वय १८) यानेही विषारी औषध प्राशन केले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. लक्ष्मीपुरी परिसरातील हॉटेल पल्लवी येथे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. व्यावसायिक नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील व्यावसायिक विनोद जोशी हे पत्नी मीना व मुलगा श्रेयस यांच्यासोबत सोमवारी (दि. २४) कोल्हापुरात येऊन हॉटेल पल्लवी येथील रूम नं. ३१० मध्ये राहिले. पहिले दोन दिवस त्यांचा हॉटेलचे वेटर व कर्मचाऱ्यांशी संपर्क होता. वारंवार ते ‘आम्हाला डिस्टर्ब करू नका, काही लागले तर मागून घेऊ,’ असे सांगत होते. बुधवार (दि. २६)नंतर मात्र त्यांचा संपर्क कमी झाला. कर्मचाऱ्यांनीही त्यांना विनाकारण डिस्टर्ब केले नाही. शुक्रवारी त्यांचा हॉटेल सोडण्याचा कालावधी संपणार असल्याने रात्री आठच्या सुमारास वेटर त्यांच्या रूमजवळ गेला; परंतु या ठिकाणी त्याला उग्र वास आला तसेच त्याने दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने तत्काळ व्यवस्थापकांना ही बाब सांगितली. त्यांनी तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

काही वेळातच पोलीस या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी पहारीच्या साहाय्याने रूमचा दरवाजा तोडला असता आत बेडवर पती, पत्नी मृतावस्थेत तर मुलग्याच्या श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ मुलग्याला रुग्णवाहिकेमधून ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. या तिघांनीही विषारी औषध प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याजवळ आत्महत्या केल्याची चिठ्ठी आढळली. त्यावर २६ तारखेचा उल्लेख आहे. पोलिसांनी ती जप्त केली असून त्यात उल्लेख असलेल्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी तपास करीत होते.आत्महत्या स्वखुशीनेजोशी यांनी आत्महत्येसंदर्भात लिहिलेल्या चिठ्ठीत व्यापारातील नुकसान व कर्जबाजारीपणामुळे आम्ही तिघेही स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. त्या चिठ्ठीत खाली नातेवाइकांचे मोबाईल क्रमांक दिले असून, त्यांच्याशी संपर्क साधावा असेही म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेkolhapurकोल्हापूर