शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

कोल्हापूर जिल्हा बॅँकेला समन्स ¨जिल्हा उपनिबंधकांचे खरमरीत पत्र : कर्जमाफी प्रकरणातील दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 9:22 PM

कोल्हापूर : राज्य सरकारकडून पिवळी यादी येऊन सहा दिवस झाले तरी पडताळणीचे काम संथगतीने करणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी समन्स दिले

कोल्हापूर : राज्य सरकारकडून पिवळी यादी येऊन सहा दिवस झाले तरी पडताळणीचे काम संथगतीने करणाºया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला जिल्हा उपनिबंधकांनी मंगळवारी समन्स दिले. कर्जमाफीच्या कामकाजाची संपूर्ण जबाबदारी बॅँकेची असतानाही त्यांनी एकूणच या कामामध्ये सहकार विभागाला अपेक्षित सहकार्य न केल्याने राज्य पातळीवर कोल्हापूरची प्रतिमा काहीशी मलिन झाली आहे.

कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यापासून ती नेहमी चर्चेत राहिली आहे. याद्यांतील घोळाने कहरच केला आहे. यात थेट आमदार व माजी खासदारांची नावेही आल्याने राज्य सरकारच्या आयटी विभागाचे अक्षरश: वाभाडे निघाले आहेत.राज्य पातळीवर आयटी विभाग, तर जिल्हा पातळीवर जिल्हा बॅँकेचे कामकाज चांगलेच चर्चेत राहिले. पात्र, अपात्र नावांचा गुंता निर्माण झाला असताना, जिल्हा बॅँकेच्या पातळीवर ज्या पद्धतीने कामकाज होणे अपेक्षित होते, ते झालेले नाही. मध्यंतरी डाटा अपडेट करण्याचे काम जिल्हा बॅँकेत सुरू होते. त्यावेळी तर कमालीचा गोंधळ सुरू होता. बहुतांश जिल्'ांचा डाटा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. कोल्हापूर जिल्ह्याचेकाम पिछाडीवर राहिले होते. सचिवव आयुक्तांनी बॅँक प्रशासनासह सहकार विभागाची कानउघाडणी केली होती.

आता ५३ हजार ८८६ खातेदारांची पिवळी यादी गुरुवारी (दि. ११) जिल्हा बॅँकेकडे आली आहे. डाटाभरताना दिनांकाच्या ठिकाणी महिना आणि महिन्याच्या ठिकाणी दिनांक झाल्याने निकषानुसार काहीजण अपात्र ठरत आहेत. त्या माहितीची छाननी करण्याचे काम जिल्हा बॅँकेच्या पातळीवर सुरू आहे. या डाटाबाबत वरिष्ठ पातळीवरून रोज आढावा घेतला जातो; त्यामुळे किती खात्यांचे काम पूर्ण झाले याचे अपडेट जिल्हा उपनिबंधकांना असणे गरजेचे आहे. म्हणून रोज याबाबतची माहिती देण्याची सूचना दिलेली आहे; पण बॅँकेकडून सहा दिवसांत केवळ काम सुरू आहे, एवढीच माहिती सहकार विभागाला दिली जात असल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालय अडचणीत सापडले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सतत विचारणा होत असल्याने मंगळवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी बॅँकेला समन्स बजावले आहे. माहिती वेळेत दिली नाही तर बॅँकेविरोधात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.आर्थिक वर्षाचा घोळराज्य सरकारच्या कर्जमाफीत आर्थिक वर्ष व ऊस उत्पादक शेतकºयांचे कर्ज उचलीचा कालावधी यामध्ये घोळ झाला आहे. ज्यांनी सन २०१४-१५ मध्ये मार्चपूर्वी आणि सन २०१५-१६ मध्ये एप्रिलनंतर उचल केली ते शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू लागले आहेत. मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील काळम्मादेवी विकास संस्थेचे शंभराहून अधिक शेतकºयांना या जाचक अटीचा फटका बसला आहे. राज्य सरकारने कर्जमाफीचे निकष ठरविताना एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष कर्ज उचल व परतफेडीसाठी धरले आहे; पण ऊस उत्पादक शेतकºयांचे विकास सेवा संस्थांच्या पातळीवर जूनपर्यंत उचल व परतफेडीचे वर्ष असते. त्यामुळे ज्या शेतकºयांनी सन २०१४-१५ मध्ये मार्चपूर्वी आणि सन २०१५-१६ मध्ये एप्रिलनंतर उचल केली ते शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू लागले आहेत.सरकारने निकषांत बदल करून लाभ द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.