शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

‘एसी’तील साहेब वसुलीसाठी उन्हात

By admin | Published: March 04, 2016 11:28 PM

‘मार्र्चएंडिंग’ मोहीम : राष्ट्रीयीकृत बँकांतील चित्र

रमेश पाटील-कसबा बावडा  ठेवी गोळा करा, नवे खातेदार शोधा, बिझनेस वाढवा, चांगली सेवा द्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एनपीए कमी करा, असा आदेश मार्च एंडिंग जवळ आल्याने काही राष्ट्रीयीकृत बँकांना त्यांच्या व्यवस्थापकांकडून आला आहे. त्यामुळे नेहमी एअरकंडिशन केबिनमध्ये बसणारे शाखाधिकारी आता कर्जवसुलीसाठी उन्हात फिरताना दिसत आहेत.गेल्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जाची थकबाकी विविध कारणांनी वाढत चालली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एनपीए कसा कमी होईल, याकडे ब्रँच मॅनेजरनी जरा जास्तच लक्ष द्यावे, असा तगादा व्यवस्थापनाने लावला आहे. एनपीए कमी झाला नाही तर कारवाईला सामोरे जावावे लागेल, असा ‘इनडायरेक्ट’ इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे ब्रँच मॅनेजर, क्लार्क आणि एखादा शिपाई थकीत कर्जदाराच्या दारात जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.३१ मार्च जवळ आला की, बँकांची धांदल उडते ती कर्जाच्या वसुलीसाठी. स्थावर मालमत्तेचा लिलाव करणे, सोने जिन्नसाची विक्री करणे, आदी कामे बहुतेक सर्व प्रकारच्या बँकांत सुरू असतात. मार्च एंडिंगच्या वेळी नवीन खातेदार शोधणे, ठेवी वाढविणे हा हेतू यापूर्वी बँकांचा नसायचा; परंतु अलीकडच्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज वसुलीबरोबरच ठेवी वाढविणे, नवीन चांगले कर्जदार शोधणे, आदींचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत बँकांचीच सध्या धावपळ जास्त दिसते आहे.बँकेचे दैनंदिन कामकाज करत कर्जवसुलीचे, ठेवी वाढविण्याचे व नवीन खातेदार शोधण्याचे जादा काम करावे लागत असल्याने काही कर्मचारी व्यवस्थापनावर नाराज आहेत.दरम्यान, काही बँकांनी नवीन खातेदार, तसेच ठेवीचे टार्गेट पूर्ण होण्यासाठी ग्राहक सप्ताह, ग्राहक पंधरवडा अशा योजना सुरू केल्या आहेत. त्यात नागरी बँका आघाडीवर आहेत. काही बँकांत ग्राहकाने ठेव ठेवल्यास त्याला ‘गिफ्ट’ देण्यात येऊ लागले आहे. कोल्हापुरात राष्ट्रीयीकृत बँकांची सुमारे ३०० कोटींहून अधिक रकमेची थकबाकी आहे. याउलट अनेक नागरी बँकांचा एनपीए शून्य टक्के इतका आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी नागरी बँका तुलनेत निवांत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांच्या साहेबांना मात्र उन्हात घाम फुटत आहे.