शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

रविवार..! दिवसभर प्रचार

By admin | Published: October 26, 2015 12:20 AM

पदयात्रा, मोटारसायकल रॅलीने रस्ते फुलले : प्रचारगीतांनी गल्ली-बोळ दणाणले

कोल्हापूर : राजकीय पक्षांचे भिरभिरणारे ध्वज, गळ्यात स्कार्प अन् डोकीवर रंगीबेरंगी टोप्या घातलेल्या जनसमुदायाच्या निघालेल्या पदयात्रा, फटाक्यांची आतषबाजी अन् वाद्यांच्या गजराने भारलेला उत्साह, उमेदवारांचा होणारा जयघोष, बेभान झालेल्या तरुणांच्या मोटारसायकल रॅली, लाऊड स्पीकरवरील प्रचारगीतांनी भेदलेले वातावरण, प्रचारसभांतून धडाडलेल्या तोफा अशा दणकेबाज; परंतु अभूतपूर्व जल्लोषात रविवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रचाराने एक वेगळी उंची गाठली. निवडणूकपूर्व शेवटचा रविवार असल्याने सर्वच उमेदवारांनी संधी साधत जोरदार शक्तिप्रदर्शनावर जोर दिल्याने शहर अक्षरश: ढवळून गेले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आठव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-ताराराणी आघाडी आणि शिवसेना अशा चार प्रमुख राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून व्यक्तिगत गाठीभेटींबरोबरच जोरदार शक्तिप्रदर्शनावर जोर देत प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणूक जशी जवळ येईल तशी प्रचाराची आणि प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्याने कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. वाद्यांच्या गजरात पदयात्रा मतदानपूर्व शेवटचा रविवार असल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, मोटारसायकल रॅलीद्वारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे सर्वच्या सर्व ८१ प्रभागांतील वातावरण ढवळून गेले. सकाळी दहा वाजल्यापासून शहरात प्रचार पदयात्रा सुरू झाल्या. या पदयात्रांमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते. ज्या गल्लीतून, कॉलनीतून या पदयात्रा पुढे सरकतील तशी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली जात होती. सर्वच पदयात्रांत हलगी, ढोल, ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. पदयात्रांच्या गदारोळामुळे एरवी शांत असणारे परिसर अक्षरश: दणाणून गेले. पदयात्रांनी रस्ते फुललेसायंकाळी पाचनंतर पुन्हा हेच चित्र संपूर्ण शहरात पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रापेक्षा सायंकाळच्या सत्रात मात्र हा उत्साह तुलनेने अधिक दिसून आला. विशेषत: सदर बाजार, विचारेमाळ, कदमवाडी, भोसलेवाडी, यादवनगर, जवाहरनगर, राजेंद्रनगर, संभाजीनगर, सानेगुरुजी, फुलेवाडी या परिसरात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी धुमधडाक्यात मतदारांसमोर शक्तिप्रदर्शन केले. उपनगरांतील काही प्रभागांत उमेदवारांनी मोटारसायकल रॅली काढून मतदारांवर छाप पाडण्याचा प्रयत्न केला. पदयात्रा, मोटारसायकल रॅली यामुळे शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. प्रचारगीतांचा धुमाकू ळ शहरातील ८१ प्रभागांत उभा राहिलेल्या बहुतेक सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चारचाकी व तीनचाकी वाहनांवर लाऊडस्पीकर लावून प्रचार करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. शहराच्या सर्व प्रभागांत सुमारे पाचशे वाहने लाऊड स्पीकर लावून प्रचाराची धून वाजवत आहेत. लोकगीत, पोवाडे व काही प्रचलित गाजलेल्या गाण्यांच्या चालींवर प्रचारगीते रचली आहेत. शहराच्या सर्वच रस्त्यांवर अशी वाहने रविवारी फिरत होती.नेत्यांचाही दिवस व्यस्त चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक जशी पक्षीय पातळीवर प्रतिष्ठेची केली आहे, तशीच ती वैयक्तिक पातळीवरही प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे चारही पक्षाच्या नेत्यांनी शहराची गल्ली अन् बोळ पिंजून काढण्यावर भर दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ, आर. के. पोवार, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी रविवारी विविध प्रभागांत पदयात्रात भागीदारी केली, तर काही प्रभागांत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी अनेक प्रभाग पिंजून काढले. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, संजय पवार, विजय देवणे मात्र रविवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘रोड शो’च्या यशस्वितेसाठी झटत होते. त्यांनी शिवसेनेची सर्व यंत्रणा ‘रोड शो’ला भव्यता यावी म्हणून कामाला लावली होती. तरीही सकाळच्या सत्रात शिवसैनिकांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात पदयात्रा काढल्या. प्रचारासाठी ‘पेड वर्कर्स’ प्रचाराकरिता शेवटचा रविवार मिळाला असल्याने उमेदवारांचा जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याकडे कल दिसून आला. पदयात्रांसाठी दीड-दोनशे समर्थक जमविणे सर्वच उमेदवारांना अशक्य आहे. त्यामुळे पदयात्रांतून समर्थकांची गर्दी दिसावी, प्रचारात धडका आहे हे दाखविण्यासाठी काही उमेदवारांनी थेट ‘पेड वर्कर्स’चा मार्ग स्वीकारला. रोजंदारीवर काम करणारे कामगार, महिलांना प्रत्येकी तीनशे ते चारशे रुपये मानधन देऊन प्रचार पदयात्रेत सहभागी करून घेतले होते. अशा ‘पेड वर्कर्स’मळे मोठ्या संख्येने गर्दी झालेली दिसून आली. पदयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्वच समर्थकांच्या चहा, नाष्ट्याची, तर काही ठिकाणी रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात उमेदवारांनी हयगय केली नाही. शहरातील वाहतूक विस्कळीतउमेदवारांच्या पदयात्रा, मोटारसायकल रॅली, प्रचारसभा आणि आदित्य ठाकरे यांचा ‘रोड शो’ यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचारसभांचे व्यासपीठ चौकात मुख्य रस्त्यांवर घातली गेली होती. तेथे जमलेल्या गर्दीने वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागत होती. आदित्य ठाकरेंच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसादफडफडणारे भगवे झेंडे, शिवसेनेचा जयघोष, कडाडणारी हलगी, गाड्यांचे ताफे, ताराराणी चौकाकडे येणारे शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे अशा भगव्या वातावरणात युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला ताराराणी चौकातून रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला.शिवरथाच्या पुढे मोटारीवर बसून आदित्य ठाकरे यांनी रोड शो करताना शिवसैनिकांना हस्तांदोलन करून अभिवादन केले. आदित्य ठाकरे प्रथमच कोल्हापुरात आल्याने या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी साडेपाच वाजता आदित्य ठाकरे मोटारीतून ताराराणी चौकात आले. त्यावेळी शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, माजी आमदार संजय घाटगे, युवा सेना जिल्हा अध्यक्ष हर्षल सुर्वे उपस्थित होते. ताराराणी चौकातून रोड शोला सुरुवात झाली. यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. ही रॅली लिशा हॉटेलमार्गे सदर बझार, पितळी गणपती, सर्किट हाऊसमार्गे कसबा बावडा, सीपीआर चौक, जुना बुधवार पेठ तालीम, शिवसेना शहर कार्यालय, तेली गल्ली परिसर, पापाची तिकटी, गंगावेश, शुक्रवार पेठ, रंकाळावेश तालीम, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, जुना वाशी नाका, संभाजीनगर, मंगळवार पेठ, गोखले कॉलेज मार्गे व्हीनस कॉर्नर मार्गावर फिरविण्यात आली. टाकाळा येथे रोड शो समाप्त करण्यात आला.