कोल्हापूर : वनविभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या नियामक मंडळावर कोल्हापूर येथील निसर्ग संस्थेचे संचालक सुनील करकरे यांची नियुक्ती झाली.
पर्यटन क्षेत्रातील आर्थिक संधी व रोजगार निर्माण क्षमता लक्षात घेता निसर्ग पर्यटन विकास करणे, वनावर अवलंबून असलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या उपजीविकांची संधी वाढवणे आणि निसर्ग शिक्षण करणे यासाठी हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे. करकरे हे १९८६ पासून पर्यटन आणि निसर्ग शिक्षण या क्षेत्रात कार्यरत असून भारतभर त्यांचे नेहमी भ्रमण असते. पर्यावरण संतुलित पर्यटन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असून विविध शिबिरे, प्रशिक्षणांच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर परिचित आहेत.
३१०३२०२१ कोल सुनील करकरे