कोल्हापूर : कार्यालयीन दिरंगाई व काम करण्यास असक्षम असल्याच्या कारणावरून कोल्हापूर विभागीय जात पडताळणी समिती क्रमांक दोनचे उपायुक्त तथा समिती सदस्य सुनील वारे यांना गुरुवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ही कारवाई केली.या विभागाचे उपसचिव दि. स. डिंगळे यांनी त्यासंबंधीचा आदेश बुधवारी काढला आहे. वारे यांच्यावर अनियमिततेबाबत शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४(१)(अ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून ही कारवाई केल्याचे त्यात म्हटले आहे. निलंबनाच्या काळात वारे यांचे मुख्यालय पुणे राहील. वारे यांच्यावर कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला असला, तरी दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या बोगस जात पडताळणी दाखल्यांप्रकरणी त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. बोगस दाखल्यांप्रकरणी बार्टीने नेमलेल्या चौकशी समितीपुढे आक्षेपार्ह मुद्दे पुढे आल्यानेच ही कारवाई केल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. वारे यांच्यावरील कारवाईने जात पडताळणी कार्यालयात खळबळ उडाली.कार्यालयात अनुपस्थित राहणे, हजारो दाखले प्रलंबित असूनही योग्यप्रकारे पडताळणी करून त्यांचे निराकरण करण्यात अपयश'दक्षता पथकाचीही चौकशी होणारदक्षता पथक व जात पडताळणीचे विधी विभागाशी बोगस दाखले प्रकरण, तसेच विशिष्ट जाती व व्यक्तींचे दाखले तातडीने देण्याबाबत काही लागेबांधे आहेत का? याची ‘बार्टी’च्या पथकाने चौकशी केली आहे. बोगस दाखल्यांप्रकरणी पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. तपास अधिकारी बदलून या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याबाबत बार्टीतर्फे जिल्हा पोलीसप्रमुखांसह राज्य शासनास पत्रव्यवहार केला जाणार आहे.
‘जातपडताळणी’चे सुनील वारे निलंबित
By admin | Published: March 20, 2015 12:19 AM