कोल्हापूर : राष्ट्रवादीतून महापौरपदासाठी अॅड. सुरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतला. उपमहापौरपदासाठी ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा येथे आमदार सतेज पाटील यांनी काँगे्रस नगरसेवकांसमवेत बैठक घेतली. अशोक जाधव, संजय मोहिते यांना सहा-सहा महिन्यांसाठी उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला.राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांनी महापौरपदाचा, तर काँगे्रसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठक झाली.
यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक अजित राऊत, मुरलीधर जाधव, माधवी गवंडी, सरिता मोरे, वहिदा सौदागर, आदील फरास, राजू लाटकर, सचिन पाटील, आदी उपस्थित होते. अजिंक्यतारा येथे झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, सभागृह नेते दिलीप पोवार, नगरसेवक भूपाल शेटे, आदी नगरसेवक उपस्थित होते.अशी एकी कायम ठेवा : मुश्रीफमाजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांनी अॅड. सूरमंजिरी लाटकर यांना उमेदवारी द्यावी, अशी भावना सर्व नगरसेवकांची असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व नगरसेवकांची वैयक्तिक मते घेण्याची आवश्यकता नाही. हा सर्वांचा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर आमदार हसन मुुश्रीफ यांनी सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, अशीच एकी कायम ठेवा, एक वर्षाने महापालिकेची निवडणूक असून शहरातील विकासकामे करा, अशा सूचना केल्या.अनुराधा खेडकर यांची दांडीशिक्षण समिती सभापती अनुराधा खेडकर यांनी बैठकीला दांडी मारली. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे सासरे आनंदराव खेडकर यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.भाजपचे तीन सदस्य काँगे्रसच्या संपर्कातगेल्या चार वर्षांपासून भाजपला पाठिंबा दिलेले मनसेचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्यासह भाजपच्या आश्विनी बारामते, संभाजी जाधव यांनी अजिंक्यतारा येथे जाऊन काँगे्रसच्या बैठकीत हजेरी लावली.महापौरपद दीड महिन्यासाठीचपुढील महापौरपद दीड महिन्यासाठीच असणार आहे. त्यानंतर पुढील वर्षासाठी हे पद काँगे्रसकडेच राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जाधव, मोहिते यांना सहा-सहा महिन्यांसाठी उपमहापौरपदकाँगे्रसला पुढील एक वर्ष उपमहापौरपद राहणार आहे. तशी ग्वाही मागील वेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सध्या काँगे्रसमधून अशोक जाधव व संजय मोहिते या पदासाठी इच्छुक आहेत.