शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

प्रचाराचा आज ‘सुपर संडे’

By admin | Published: October 25, 2015 12:47 AM

महापालिका निवडणूक : रंगत भरली, शहर दणाणले; पुढच्या पाच दिवसांत तोफा धडाडणार

 कोल्हापूर : विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आरोपांच्या फैरी झडायला लागल्यामुळे महानगरपालिका निवडणुकीतील रंगत वाढू लागली आहे. निवडणूक प्रचारात शहराचा विकास, कोल्हापूरचा ‘स्मार्ट सिटी’तील समावेश, महापालिकेतील भ्रष्टाचार या स्थानिक मुद्द्यांबरोबरच देशातील आणि राज्यातील भाजप सरकारचा कारभार, दलितांवरील हल्ले, वाढत चाललेली महागाई, आदी मुद्दे चर्चेचे ठरले आहेत. विशेषत: तूरडाळीच्या दरवाढीचीही हलगी वाजविली जाऊ लागली आहे. आज निवडणूकपूर्व शेवटचा रविवार असल्याने शहरात सर्वत्र प्रचाराची जोरदार तयारी झाली असून, शिवसेनेने आयोजित केलेला आदित्य ठाकरे यांचा रोड शो विशेष आकर्षण ठरणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या रविवारी (१ नोव्हेंबर) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आज, रविवारपासून पुढे पाच दिवस प्रचाराची ही रणधुमाळी आणखी जोर घेणार आहे. पुढच्या पाच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माणमंत्री रवींद्र वायकर, भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृहराज्यमंत्री राम शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही तोफा धडाडणार आहेत. दसरा झाला आणि शुक्रवार (दि. २३)पासून प्रचाराची रंगत कमालीची वाढली. उमेदवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते प्रभागाचा कोपरान्कोपरा पिंजून काढत आहेत. मतदारांना साद घालत आहेत. लाऊड स्पीकर लावून प्रचार करणारी वाहने तर एकेका मिनिटाला गल्ली, कॉलनीत पोहोचत आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण प्रचाराच्या गदारोळात न्हाऊन गेले आहे. प्रचारात पुरुषांबरोबरीने महिलाही मोठ्या संख्येत उतरल्या आहेत. विशेषत: सायंकाळी प्रचाराच्या पदयात्रा सुरू होऊन त्या रात्रीपर्यंत प्रभागात दिसत आहेत. उमेदवार तर पायांना भिंगरी बांधल्यासारखे पळत आहेत. गेल्या दोन दिवसांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तोफा डागून प्रचारात रंगत भरली. चव्हाण यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले, तर खडसे यांनी कॉँग्रेसच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. या दोन नेत्यांच्या सभांनी प्रचारात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. भाजपने युती केली नसल्याने शिवसेना नेत्यांचा राग अनावर झाल्याचे दिसत आहे. सेना नेते आक्रमकपणे प्रचारात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांचा रोड शो युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आज, रविवारी कोल्हापुरात येत असून दुपारी चार वाजता ताराराणी चौक येथून त्यांचा रोड शो होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते दुपारी साडेतीन वाजता दिगंबर जैन बोर्डिंग येथे होणार आहे. त्यांची रॅली बापट कॅम्प, कदमवाडी, सदर बझार, पितळी गणपती, रमणमळा, सीपीआर रुग्णालय, सिद्धार्थनगर, जुना बुधवार पेठ, नष्टे गल्ली, बुरुड गल्ली, पिवळा वाडा कॉर्नर, तेली गल्ली, जोशी गल्ली, पापाची तिकटी, गंगावेश, उत्तरेश्वर, दुधाळी, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, रंकाळवेश तालीम, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक, उभा मारुती, जुना वाशीनाका, देवकर पाणंद, संभाजीनगर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, दिलबहार तालीम, गोखले कॉलेज, पांजरपोळ, राजारामपुरी, सायबर चौक मार्गे व्हीनस कॉर्नर येथे विसर्जित होईल. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या रोड शोमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून, हा रोड शो यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक झटत आहेत. प्रचाराची रंगत वाढेल तसे शिवसेनेचे जिल्ह्यातील सहाही आमदार प्रचारात उतरले आहेत. अशोक चव्हाण आज कोल्हापुरात कॉँग्रेस पक्षाची आज, रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रायव्हेट हायस्कू ल मैदानावर जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, चंद्रकांत हंडोरे, सतेज पाटील, पी. एन. पाटील मार्गदर्शन करणार आहेत.