जयसिंगपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शस्त्र परवाना धारकांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शस्त्र परवाना धारकांची शस्त्रे आचारसंहिता कालावधित पोलीस विभागाने जमा करावीत, निवडणुकीनंतर सात दिवसात परवाना धारकांना त्यांची शस्त्रे परत देण्याची कार्यवाही करण्याच्याही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
...................
निवडणुकीसाठी १२८० जणांची नियुक्ती
शिरोळ : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १२८० शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, तसेच कृषी व भूमिअभिलेख यांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एकूण केंद्रांनुसार २५० जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.