कोल्हापूर कोविडच्या काळात कार्यक्रम बंद असल्यामुळे विविध प्रकारच्या कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कलापथक, ऑर्केस्ट्रा मध्ये काम करणारे वादक, गायक, तसेच वाघ्या-मुरळी, लोककलावंत यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रसिद्ध तबला वादक पं. आमोद दंडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अडीचशे कलाकारांना एक महिना पुरेल इतके अन्न-धान्य प्रदान केले.
यासाठी त्यांना भारत, अमेरिका व सिंगापूर येथील त्यांच्या अनेक शिष्य व मित्रांनी सढळ हस्ते मदत केली. त्यांना या उपक्रमात कोल्हापुरातील भार्गव कांबळे, गुरू ढोले, संदेश खेडेकर, राजेंद्र लकडे, संदेश गावंदे व त्यांच्या कुटुंबीयांचे सहकार्य लाभले.
२९०५२०२१ कोल आमोद दंडगे
पंडित आमोद दंडगे यांच्या पुढाकारातून कलाकारांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.