कळंबा : अखिल भारतीय किसन सभेने केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी विधेयकाला विरोध आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील नगर विकास कृती समितीच्या वतीने रिंगरोडवर माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर यांनी जमिनीत खड्डा खणून स्वतःला गाडून घेत निषेध नोंदविला. यावेळी शेतकरी समर्थनार्थ केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनास करवीर पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोध दर्शविला होता, आंदोलन सुरू असतानाच करवीर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आंदोलकांना खड्ड्यातुन बाहेर काढून समज दिली. या अनोख्या आंदोलनाची रिंगरोडवर व सोशल मीडियावर दिवसभर चर्चा रंगली होती.
०८ कळंबा आंदोलन
फोटो मेल केला आहे
फोटो ओळ - कृषी विधेयकाला विरोध व भारत बंद आंदोलनास पाठिंबा म्हणून रिंगरोडवर माजी नगरसेवक अमोल माने व सुहास आजगेकर यांनी जमिनीत स्वतःला गाडून घेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यापासून परावृत्त केले.