शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

संचालकांसाठी नव्हे, शेतकरी-कामगारांसाठीच गडहिंग्लज कारखान्याला सहकार्य : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 8:28 PM

panchayat samiti HasanMusrif Kolhapur : कागल मतदारसंघातही गडहिंग्लज कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि कामगार आहेत. त्यामुळे त्यांच्या हितासाठीच आपण कारखान्याला सहकार्य करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसंचालकांसाठी नव्हे, शेतकरी- कामगारांसाठीच गडहिंग्लज कारखान्याला सहकार्य : मुश्रीफथकहमी,कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील :  हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : कागल मतदारसंघातही गडहिंग्लज कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि कामगार आहेत. त्यामुळे त्यांच्या हितासाठीच आपण कारखान्याला सहकार्य करणार असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी स्पष्ट केले.गडहिंग्लज येथे पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी गडहिंग्लज कारखाना, गडहिंग्लज अर्बन बँक व आंबेओहोळच्या पूर्ततेचा श्रेयवाद या विषयांवरही त्यांनी खास शैलीत टिप्पणी केली.मुश्रीफ म्हणाले, संचालकांना कंपनी कधी एकदा कारखाना सोडून जाते असे झाले होते.ते अनुभवी आहेतच.परंतु, त्यांच्याकडे न पाहता आपल्या मतदारसंघातील कारखाना असल्यामुळे तो चालला पाहिजे, यासाठी शासनाची थकहमी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.तसेच जिल्हा बँकेचेदेखील कारखान्याला सहकार्य राहील.अधिकाराचा गैरफायदा घेवून सरव्यवस्थापकानेच गडहिंग्लज अर्बन बँकेत अपहार केला.त्यामुळे बँकेची बदनामी झाली.तालुक्यातील एक चांगली बँक म्हणून बँकेची ओळख आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सर्वप्रकारची मदत बँकेला केली जाईल,अशी ग्वाही मुश्रीफ यांनी बैठकीत दिली. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, तहसिलदार दिनेश पारगे, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर, माजी जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील, डॉ.चंद्रकांत खोत,डॉ. मल्लिकार्जून अथणी उपस्थित होते.सीमेवर होणार अ‍ॅण्टीजेन तपासणी !गडहिंग्लज विभागातील शिनोळी, कानूर आणि गवसे या तीन ठिकाणी तपासणी नाके सुरु करा. इतर राज्यातून येणार्‍यांना नाक्यांवर अ‍ॅण्टीजेन तपासणी करूनच प्रवेश द्या,असा आदेश मुश्रीफ यांनी दिला.सासर - माहेर दोन्ही सारखंच !आंबेओहोळ धरणाचे काम पूर्ण झाले आहे. धरणात पाणी साठवले जात आहे.परंतु,कांहीजण आपल्यामुळेच धरण झाले,अशा अविर्भावात आहेत. असे श्रेय लाटणे म्हणजे ' येड्याबाईला सासर काय आणि माहेर दोन्ही सारखचं' अशा शब्दांत मुश्रीफ यांनी नामोल्लेख टाळून समरजित घाटगे यांची खिल्ली उडविली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर